शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

खाेदकामामुळे वाहतुकीची काेंडी, रहदारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा वाहतूक काेंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागताे. मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर व बालोउद्यानच्या बाजूने गेलेली नाली अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहे. परंतु अद्यापही बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला नाही.

ठळक मुद्देचामाेर्शीतील स्थिती : लक्ष्मीगेट ते मुख्य बाजारपेठ मार्ग; रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी केले अतिक्रमण

लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरुन लाेकांचे आवागमन असते. त्यातच तालुक्याच्या विविध गावातून अनेक गावातील नागरिक कार्यालयांमध्ये कामानिमित्त येतात. येथील लक्ष्मीगेटपासून मुख्य बाजारपेठेत नागरिकांची अधिक वर्दळ असते. परंतु याच मार्गालगत नालीचे बांधकाम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी खाेदकाम केले आहे. परंतु बांधकामास अद्यापही सुरूवात झाली नाही. खाेदकामामुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची काेंडी निर्माण हाेऊन रहदारीची समस्या निर्माण झाली आहे.चामाेर्शी शहरातील लक्ष्मी गेट ते मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची तसेच पादचाऱ्यांची गर्दी असते. आठवडी बाजाराच्या दिवशी तर अनेकदा वाहतूक काेंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागताे. मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर व बालोउद्यानच्या बाजूने गेलेली नाली अनेक दिवसांपासून खोदून ठेवली आहे. परंतु अद्यापही बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला नाही. खाेदकाम केलेल्या बाजूला टिनाचे पत्रे लावून ठेवण्यात आले आहेत. परंतु बाहेरुन येणाऱ्या अथवा अनभिज्ञ असलेल्या नागरिकांची येथे दिशाभूल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर उजव्या बाजूला टेलिफोन वायरिंग बॉक्स बसविला आहे. अपघात होऊ नये म्हणून टिनपत्रे लावण्यात आली आहेत, परंतु हा यावरील उपाय नव्हे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य हायवे मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने व एकेरी वाहतूक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक तसेच बाजारपेठ मार्गालगत नालीसाठी खाेदकाम यामुळे येथे वारंवार वाहतुकीची काेंडी हाेते. बाजारच्या दिवशी अनेक दुकानदार रस्त्यालगत विविध वस्तू विक्रीची दुकाने लावतात. याच रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहने तसेच नागरिक पायी जात असतात. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प होते. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून नालीचे बांधकाम न केल्यास येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता नागरिक वर्तवित आहेत. मुख्य बाजारपेठेतील मार्गानेच नागरिक पाेलीस ठाणे तसेच मार्कंडादेव व हेटी आदी गावांकडे जातात. त्यामुळे बाजाराचा दिवस वगळून सुद्धा वाहनांची वर्दळ असते. बाजाराच्या दिवशी तर वाहतुकीची काेंडी निर्माण हाेते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नालीचे बांधकाम लवकर करावे. तसेच बाजाराच्या दिवशी काेंडी काढण्यासाठी उपाययाेजना करावी. नगरपंचायतने नियाेजन करण्याची मागणीचामाेर्शी शहरात दर गुरूवारी आठवडी बाजार भरताे. या दिवशी भाजीपाला, फळे व विविध वस्तु विक्रेते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसतात. याच मार्गाने ट्रक, टेम्पो, पिकअप व अन्य वाहने ये-जा करीत असतात.याशिवाय नागरिकांचीही वर्दळ असते. वाहतुकीची काेंडी हाेऊ नये म्हणून नगरपंचायत प्रशासनाने उपाययाेजना किंवा याेग्य नियाेजन करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, कॉग्रेसचे जिल्हा महासचिव कालिदास बुरांडे व नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी