शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या निधनानंतरही तिला आधार दिला नाही, उलट हुंड्यासाठी केला छळ ! गडचिरोली शहरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:19 IST

Gadchiroli : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा हुंड्यासाठी आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका ३३ वर्षीय अधिपरिचारिकेचा हुंड्यासाठी आणि पगाराच्या पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

निशा पंकज मेश्राम (रा. मेडिकल कॉलनी, गडचिरोली) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह ७ मार्च २०२१ रोजी पंकज ठाकूरदास मेश्राम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच सासू आणि नणंदेने पतीचे कान भरायला सुरुवात केली. निशा यांनी स्वतःच्या नावाने प्लॉट खरेदी केल्यावर, तो सासूच्या नावे करण्यासाठी, संपूर्ण पगार सासरच्यांना देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकून मारहाण केली, असा आरोप आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

निशा मेश्राम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती पंकज ठाकूरदास मेश्राम, सासू संगीता ठाकूरदास मेश्राम, सासरे, ठाकूरदास बुधाजी मेश्राम, मोठी नणंद मनीषा कोमल ओंडरे, मोठे सासरे रोहिदास बुधाजी मेश्राम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मनीषा बागमारे ह्या करीत आहेत.

पगार न दिल्यास घरातून हाकलण्याची धमकी

निशा गरोदर असतानाही त्यांना ड्युटीवर जाण्या-येण्यासाठी सहकार्य न करता त्रास देण्यात आला. तसेच हिणवण्यात आले आणि पगार न दिल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली.त्यांना मानसिक आधार आईच्या मृत्यूनंतरही सासरच्यांनी देण्याऐवजी पतीला त्यांच्यापासून दूर राहण्यास भडकावले, असा आरोप निशा मेश्राम यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Woman Harassed for Dowry After Mother's Death; Case Filed

Web Summary : A nurse in Gadchiroli faced dowry harassment and pressure for her salary from her in-laws, even after her mother's death. Police have registered a case against her husband and four others.
टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली