शौचालयांची बांधकामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना १२ हजार निधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:47 IST2025-03-27T16:46:21+5:302025-03-27T16:47:53+5:30

Gadchiroli : १००१ शौचालयाचे काम डिसेंबरपासून १० मार्चपर्यंत पूर्ण झाले

Even after the construction of toilets is completed, the beneficiaries do not get Rs 12,000 in funds. | शौचालयांची बांधकामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना १२ हजार निधी नाही

Even after the construction of toilets is completed, the beneficiaries do not get Rs 12,000 in funds.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:
भारत स्वच्छ मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामे जिल्ह्यात मंजूर करण्यात आली. लाभार्थी नागरिकांनी पदरचे पैसे खर्च करून कसेबसे शौचालय बांधले. मात्र बांधकामे पूर्ण झाली तरी अजूनही लाभार्थ्यांना अनुदानाचे १२ हजार रुपये मिळाले नाहीत. जवळपास एक हजार शौचालयांचे १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान खात्यात जमा झाले नाही. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चा दुसरा टप्पा, ग्रामीण भागात राबविला जात आहे. उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी ही योजना आहे.


तीन महिने उलटले
तीन महिने उलटूनही शौचालयाचे पैसे मिळाले नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. भारत सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज प्राप्त करण्यासाठी, स्वच्छता सुधारण्यासाठी आणि २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी ही योजना प्रभाविपणे राबविली जात आहे.


बांधकाम पूर्ण शौचालये
भामरागड - ७९
अहेरी - १८६
सिरोंचा - १०३
चामोर्शी - १०३
आरमोरी - ५६
गडचिरोली - ७३
कोरची - ७५
धानोरा - ५१
देसाईगंज - ५८
मुलचेरा - १६५
कुरखेडा - ५२


बीपीएल कुटुंबांना मिळतो लाभ
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी, घरकुल असलेले भूमिहीन मजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे, आदींना शासनाच्या योजनेतून शौचालय मंजूर करण्यात येते. पूर्वी अनुदान लवकर मिळत होते. आता विलंब होत आहे.


बँकेत विचारपूस
शौचालयाचे पैसे बँक खात्यात जमा झाले काय, हे पाहण्यासाठी लाभार्थी बँकेत जाऊन चौकशी करीत आहेत. बँकेत अनेक वृध्द महिला व पुरूष लाभार्थी येऊन पैसे जमा झाले का याची विचारपूस करतात.

Web Title: Even after the construction of toilets is completed, the beneficiaries do not get Rs 12,000 in funds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.