एटापल्लीवासीयांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:49+5:30
या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्राचार्य श्यामराव बुटे, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांच्यासह पोलीस व शिक्षण विभागातील स्टाफ उपस्थित होता.

एटापल्लीवासीयांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध
लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहानिमित्त २ ते ८ डिसेंबरदरम्यान बंद पाळण्याचे आवाहन धुडकावून लावत येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भव्य शांतता रॅली काढून आम्हाला हिंसा नको, शांतता आणि विकास हवा, असाच जणू संदेश दिला आहे.
एटापल्लीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहारपर्यंत ही शांतता रॅली काढण्यात आली. यात भगवंतराव महाविद्यालय व माध्यमिक आश्रमशाळेचे ३०० विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक असे ४००पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्राचार्य श्यामराव बुटे, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांच्यासह पोलीस व शिक्षण विभागातील स्टाफ उपस्थित होता.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. या रॅलीतून सर्वांनी आम्हाला हिंसा नकाे, शांतता हवी हाच संदेश दिला.