कुनघाडा रै येथे शेतकरी गटाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:44+5:302021-06-27T04:23:44+5:30
प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे राजेंद्र चौधरी, बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर चेतन वैद्य, गडचिरोली मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सोरते, उप ...

कुनघाडा रै येथे शेतकरी गटाची स्थापना
प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे राजेंद्र चौधरी, बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर चेतन वैद्य, गडचिरोली मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सोरते, उप शाखा व्यवस्थापक तोटावार, चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव एच.एम.बी.मूर्ती, नागपूरचे शाखा व्यवस्थापक महेश धांडोले, दिनेश खडसे, पी.सी. चहारे आदी उपस्थित होते. शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम भारत सरकार करीत आहे. राज्ये आणि जिल्ह्यात स्थापन झालेल्या उत्पादक संस्था आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहेत. सदस्य शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. सन २०२० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला वाव देण्यासाठी संपूर्ण देशात १० हजार शेतकरी संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या देखरेखीखाली राबविला जाणार आहे. शेतकरी उत्पादक गट महिला वर्ग - कविता रमेश बारसागडे , इंदिरा दिनकर दुधबळे, रेखा अनिल कुनघाडकर, इतर मागास वर्ग- अरुण कुनघाडकर, विलास कुकडे, भाऊराव नैताम, अनुसूचित जाती- देवानंद बांबोडे, कपिल दुर्गे, अनुसूचित जमाती- रामगोपाल अलाम, टीकाराम मरापे यांची निवड करण्यात आली.
===Photopath===
250621\3440img-20210624-wa0197.jpg
===Caption===
कुनघाडा रे येथे शेतकरी गटाची स्थापना फोटो