गुरनोलीत गोचीड निर्मूलन व लसीकरण
By Admin | Updated: June 4, 2014 23:46 IST2014-06-04T23:46:46+5:302014-06-04T23:46:46+5:30
गुरनोली येथे आयोजित आदर्शगाव जनजागृती व ग्रामविकास सप्ताहानिमित्त गोचीड निर्मूलन कार्यक्रम तसेच पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, औषधोपचार व दुग्ध उत्पादन या विषयावर चर्चासत्नाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरनोलीत गोचीड निर्मूलन व लसीकरण
कुरखेडा : गुरनोली येथे आयोजित आदर्शगाव जनजागृती व ग्रामविकास सप्ताहानिमित्त गोचीड निर्मूलन कार्यक्रम तसेच पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, औषधोपचार व दुग्ध उत्पादन या विषयावर चर्चासत्नाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील यशवंत ग्राम गुरनोली येथे गेल्या १ जूनपासून आयोजित करण्यात आलेल्या सप्ताह अंतर्गत साप्ताहच्या ३ तिसर्या दिवशी गावातील पशुंच्या गोठय़ात रोग प्रतिबंधात्मक औषधांची स्प्रेद्वारे फवारणी करण्यात आली. जनावरांना गोचीडची लागण झाल्याने म्हशींचे रक्त शोषून घेते ज्यामुळे रक्त कमी झाल्याने ते अशक्त होतात व पशु पालकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. या बाबतीत गुरनोली येथे जनजागृती करून गावातील प्रत्येक गोठय़ात फवारणी करण्यात आली. या प्रसंगी तालुका पशु व सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. गजभिये, गेवर्धाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भगत, कुरखेडा पंचायत समितीचे पशु वैधकीय अधिकारी डॉ. वैद्य तसेच कढोलीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भाकड, सहाय्यक बारापात्ने प्रामुख्याने उपस्थित होते.
गावातील फवारणीच्या कार्यक्रमा नंतर गुरनोली ग्रामपंचायत सभागृहात पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, औषधोपचार व दुध उत्पादन या विषयावर चर्चासत्नाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुरखेडा तालुका पशु व सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. गजभिये हे होते तर प्रमुख मार्गदर्शक हे डॉ. भाकड होते. उपस्थित ग्रामस्थांना पावसाळ्यात पशूंना होणार्या संभाव्य रोगांच्या प्रादुर्भावा पासून रक्षण करण्याकरिता घ्यावयाची दक्षता व रोगाची लागण झाल्यास करावयाचे औषधोपचार या विषयी महत्वाची माहिती देण्यात आली. दुध उत्पादनात वाढ करण्याकरिता पशूंच्या आहारासंबंधी करावयाचे बदल व संसर्गापासून बचाव आदीबाबत माहिती देण्यात आली.
कुरखेडा तालुका पशु व सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. गजभिये यांनी ग्रामस्थांना पशुसंवर्धन विभागाकडून राबविल्या जाणार्या विविध योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गुरनोली ग्रामपंचायतचे कर्मचारी भीमराव भैसारे, विनोद चौधरी, भोजराज मरस्कोल्हे, सरपंच लहूजी किरंगे, उपसरपंच राजनपाटील खुणे, आदशर्गाव गुरनोली ग्रामस्तरीय समिती चे अध्यक्ष आनंदराव उसेंडी, तौसीफ शेख, लोकेश नेवारे, नसीर हाशमी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)