तालुक्याला कुपोषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:44+5:30
तालुक्यात एकूण १४७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. यातील काही बालके दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाºया संपूर्ण योजना कागदावरच असल्याचे यावरून दिसून येत आहे. कुपोषित बालक जन्मास येऊ नये, यासाठी महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभागाकडून विविध सोयीसवलती व उपाययोजना आखल्या जातात.

तालुक्याला कुपोषणाचा विळखा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सर्व सोयीयुक्त, सधन, पोषक अशी ओळख असलेल्या देसाईगंज तालुक्यातही कुपोषणाची समस्या कायम आहे. तालुक्यातील ८ बालके चवथ्या श्रेणी तर १३९ बालके तिसऱ्या श्रेणीचे कुपोषित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिणामी देसाईगंज तालुकाही कुपोषणाच्या विळख्यात सापडला आहे.
तालुक्यात एकूण १४७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. यातील काही बालके दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाºया संपूर्ण योजना कागदावरच असल्याचे यावरून दिसून येत आहे.
कुपोषित बालक जन्मास येऊ नये, यासाठी महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभागाकडून विविध सोयीसवलती व उपाययोजना आखल्या जातात. गरोदर मातेचे नियमित वजन, आहार, विहार, पुरोक औषधोपचार, शरीरातील रक्ताच्या प्रमाणाची नियमित तपासणी, गावपातळीवर वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. जन्मास येणारा बाळ सुदृढ व नियोगी राहण्यासाठी रक्तवाढीचे व जीवनसत्वयुक्त औषध नि:शुल्क पुरविल्या जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मातांसाठी जननी सुरक्षा योजना राबविली जाते. कुपोषणावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूूद करीत असते.
केंद्र शासनाच्या अतिमागास जिल्ह्याच्या यादीत गडचिरोली जिल्ह्याचा १२ वा क्रमांक लागतो. जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात १ ते ६ वर्ष वयोगटातील ४ हजार ७१५ बालकांपैकी ३ हजार ३३० बालके साधारण असून मध्यम वजनाचे १ हजार २०३ बालके आहेत. यापैकी तीव्र कुपोषित म्हणजे कमी वजनाचे १८३ बालके आहेत. यामध्ये विसोरा, शंकरपूर, डोंगरमेंढा, पिंपळगाव, कुरूड आदी गावातील बालकांचा समावेश आहे.
बालविकास केंद्रामध्ये कुपोषित बालकाला दाखल होताना त्या बालकाचे वय, वजन, उंची तसेच श्रेणीचे वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला बालकाचे वजन घेतले जाते. त्यानंतर प्रगती आढावाचा श्रेणी वर्गीकरण केले जाते. बालकाच्या वजनात सुधारणा झाल्यानंतर बालविकास केंद्र सोडतानाच्या वजनाच्या स्थितीची नोंद घेतल्या जाते. हा प्रकार केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक नाही
देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात मागील एक वर्षापासून बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचे पद रिक्त आहे. तसेच येथे नियमित वैद्यकीय अधीक्षकही नाही. प्रभारी वैद्यकीय अधीक्षकाच्या भरवशावर सदर रुग्णालयाची आरोग्यसेवा सुरू आहे. कुपोषणाचा वाढता प्रभाव पाहून येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
देसाईगंज तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना औषधोपचार घेण्यासाठी अडचणी येत आहेत. बऱ्याचदा कर्मचारीच उपचार करतात.
मागील पाच-सहा महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील कुपोषण नियंत्रित आहे. नियमित पोषण आहार व वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सॅम (त्तीव्र कुपोषित)च्या रुग्णांना दुर्धर आजाराने ग्रासले असल्याने त्यांच्यात पाहिजे तशी सुधारणा झाली नाही.
- निर्मला कुचिक, बालविकास प्रकल्प अधिकारी, देसाईगंज