कार अपघातात अभियंता गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:04 IST2018-04-01T00:04:19+5:302018-04-01T00:04:19+5:30

कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळल्याने शाखा अभियंता महेश कारेंगुलवार गंभीररित्या जखमी झाले.

Engineer serious in a car crash | कार अपघातात अभियंता गंभीर

कार अपघातात अभियंता गंभीर

ठळक मुद्देवाहन झाडावर धडकले : डोंगरगाव फाट्यानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळल्याने शाखा अभियंता महेश कारेंगुलवार गंभीररित्या जखमी झाले. ही घटना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. कारेंगुलवार हे कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
सध्या मार्च अखेर असल्याने ते कोरची परिसरात कामांची पाहणी करण्यासाठी गेले होते. कोरचीवरून परत येत असताना डोंगरगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशझोतामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार झाडावर आदळल्याचे समजते. कारेंगुलवार यांच्या डोक्याला दुखापत असून उजव्या हाताचे हाड मोडले आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Engineer serious in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात