रेल्वे रुळावर डाेके ठेवून संपवले जीवन; मानसिक संतूलन बिघडलेल्या कारण आले समोर

By दिगांबर जवादे | Updated: December 2, 2023 20:28 IST2023-12-02T20:28:03+5:302023-12-02T20:28:57+5:30

दरम्यान रेल्वे येताच बघून दुधरामने रेल्वे रूळावर आपला डाेक ठेवला. यात डाेका व धडाचे दाेन भाग हाेऊन ते दाेन बाजूला पडले.

Ended life by laying on railway tracks | रेल्वे रुळावर डाेके ठेवून संपवले जीवन; मानसिक संतूलन बिघडलेल्या कारण आले समोर

रेल्वे रुळावर डाेके ठेवून संपवले जीवन; मानसिक संतूलन बिघडलेल्या कारण आले समोर

गडचिराेली : मानसिक संतूलन बिघडलेल्या गांधीनगर येथील इसमाने रेल्वे रूळावर स्वत:चे डाेके ठेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी दुपारी देसाईगंज-वडेगाव दरम्यान घडली.

दुधराम राजीराम मोहुर्ले (४५) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. दुधरामची पत्नी चार वर्षांपूर्वी मरण पावली. तेव्हापासून ताे मानसिक तणावात हाेता. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एनबॉक्स ही मालवाहू रेल्वे देसाईगंज रेल्वेस्थानकावरून गाेंदियाकडे जाण्यास निघाली. दरम्यान रेल्वे येताच बघून दुधरामने रेल्वे रूळावर आपला डाेका ठेवला. यात डाेका व धडाचे दाेन भाग हाेऊन ते दाेन बाजूला पडले.

ही बाब रेल्वे पाेलिसांना माहित हाेताच त्यांनी तत्काळ दुधरामच्या नातेवाईकांना ही बाब कळवली व त्यांना घटनास्थळी बाेलवले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दुधराम यांना दाेन मुले आहेत. चार वर्षांपूर्वी आई मरण पावली. आता वडिलाने आत्महत्या केली. त्यामुळे ही दाेन्ही मुले अनाथ झाली आहेत. देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ended life by laying on railway tracks