नवेगावच्या गायरान व ढाेरफाेडीच्या जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:55+5:302021-07-17T04:27:55+5:30
नवेगाव माल येथील शासकीय स्मशानभूमी सर्व्हे. नं. ४९१ व आराजी १.७९ हे.आर.मध्ये आहे, तर ढोरफोडी सर्व्हे नं. ४७६ आराजी ...

नवेगावच्या गायरान व ढाेरफाेडीच्या जागेवर अतिक्रमण
नवेगाव माल येथील शासकीय स्मशानभूमी सर्व्हे. नं. ४९१ व आराजी १.७९ हे.आर.मध्ये आहे, तर ढोरफोडी सर्व्हे नं. ४७६ आराजी ०.४९ हेक्टर आर क्षेत्रात आहे. अनेक पिढ्यांपासून गावातील नागरिक सदर जागेचा वापर करीत आहेत. मात्र त्या शासकीय जागेला लागून असलेले काही शेतकरी व इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे गावातील पाळीव जनावरांच्या चराईचा प्रश्न आहे. जनावरे चराईसाठी कुठे न्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे. तसेच शासकीय जागेअभावी अंत्यविधी कुठे करावा हीसुद्धा समस्या आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करू नये अशी तरतूद असताना अतिक्रमण केले जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे ५ जानेवारी १९९३चे परिपत्रक आहे. यानुसार ग्रामपंचायतींना अतिक्रमण काढण्याचे अधिकार असून, ग्रामपंचायतला व अतिक्रमण काढणे शक्य नसल्यास ही बाब ठरावाव्दारे जिल्हाधिकारी यांना निदर्शनास आणून दिल्यास असे अतिक्रमण जिल्हाधिकारी काढू शकतात.
सार्वजनिक वापरातील जमीन गायरान जमीन इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी महसूल व वनविभाग मंत्रालय अंतर्गत १२ जुलै २०११च्या शासन निर्णयानुसार गायरान, गुरेचराई अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती, खासगी संस्था, संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करू नये, अशीही तरतूद या परिपत्रकात नमूद आहे. त्यामुळे नवेगाव मालच्या ११७ ग्रामस्थांनी गायरान व ढोरफोडी या शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी चामोर्शी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नवेगाव माल ग्रामपंचायतीस निवेदन देऊन मागणी केली आहे.
काेट
नवेगाव माल येथील गायरान व ढोरफोडी जागेवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी १२ जुलैला ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर येत्या ग्रामपंचायत मासिक सभेत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
पी. ई. दुपारे, ग्रामसेवक, नवेगाव माल
150721\4017img-20210714-wa0162.jpg
नवेगाव माल येथील ढोरफोडी व गायरान जागेवर झालेल्या अतिक्रमणाची चे फोटो