कुरखेडा राज्य महामार्गावर वाढत आहे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:48+5:302021-03-31T04:36:48+5:30
देसाईगंज : शहराच्या भुयारी पुलाच्या अगदी तोंडावर जिथून वाहने वळून मुख्य बाजारपेठेत वा कुरखेडाकडे जातात. त्याच ठिकाणी सध्या रस्त्याच्या ...

कुरखेडा राज्य महामार्गावर वाढत आहे अतिक्रमण
देसाईगंज : शहराच्या भुयारी पुलाच्या अगदी तोंडावर जिथून वाहने वळून मुख्य बाजारपेठेत वा कुरखेडाकडे जातात. त्याच ठिकाणी सध्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असल्याने या ठिकाणी अत्यंत वर्दळीचा भाग तयार होऊन मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या देसाईगंज शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. व्यापारी नगरी आहे. आतापर्यंत लाॅकडाऊनची स्थिती असल्याने बाजारात पाहिजे तेवढ्या प्रमाणात वर्दळ नव्हती. लाॕॅकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने सद्य:स्थितीत बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. ठिकठिकाणी लोकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. रेल्वेचा भुयारी पूल आवागमनासाठी सुरू झाल्यापासून कुरखेडा टी-पॉइंटवरून जो फाटकेचा मार्ग होता तो बंद झाल्याने त्या ठिकाणी मोठी मोकळी जागा निर्माण झाली आहे. त्याच्या विरुद्ध बाजूस कापडाचे माॕॅल्स आहेत. त्याच्या अगदी समोरील वरच्या फाटकबंदमुळे जी मोकळी स्पेस होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येत आहे, तसेच भुयारी पुलाच्या अगदी वाहने वळण्याच्या ठिकाणावरच अनेक दुकाने लावून बसत असल्याने एस.टी. बस, मालवाहू ट्रक व चारचाकी गाड्या फिरविण्यास अडचण निर्माण होत आहे. या बाबीवर लक्ष न दिल्यास या ठिकाणी कायमस्वरूपी ही समस्या राहून चारचाकी व दुचाकीस्वारांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.