शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत अतिक्रमण हटविले

By admin | Updated: January 21, 2016 00:15 IST

१२ वर्षांनंतर कारवाई : दीड किमी अंतरावरील व्यावसायिकांना फटका

१२ वर्षांनंतर कारवाई : दीड किमी अंतरावरील व्यावसायिकांना फटकाएटापल्ली : सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १२ वर्षानंतर आलापल्ली ते जारावंडी या प्रमुख मार्गावरील एटापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते वन विभागाच्या तपासणी नाक्यापर्यंत दीड किमी अंतरावरचे अतिक्रमण बुधवारी सकाळी १० वाजतापासून हटविण्यास सुरुवात केली.येथील मुख्य रस्ता राज्य मार्ग क्र. ३६३ वरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने २२ डिसेंबर २०१५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु अतिक्रमणधारकांनी दुर्लक्ष केले. सदर अतिक्रमण एटापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून वन तपासणी नाकापर्यंत काढण्यात आले. यात पंचायत समिती, व्यापारी संकुलाचे टिनाचे शेड अतिक्रमणात आल्याने ते पाडण्यात आले. तसेच मुख्य मार्गावरील अनेक व्यापाऱ्यांचे कच्च्या स्वरूपाचे टिनाचे शेड, नालीवरील फरशा, काही ठिकाणी उंचवटे असे अतिक्रमण दिवसभर हटविण्यात आले. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवावे, ते न हटविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात येईल, असे बजाविण्यात आले होते. सदर कारवाई उपविभागीय अभियंता एम. डी. शेवाळकर, नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, कनिष्ठ अभियंता पंकज उईके, सहायक विनोद चिंचोडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सकाळी १० वाजता ही मोहीम सुरू होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली. (तालुका प्रतिनिधी)