अतिक्रमण हटविले

By Admin | Updated: January 24, 2015 22:53 IST2015-01-24T22:53:26+5:302015-01-24T22:53:26+5:30

आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या पुलालगत आंध्रप्रदेशातील वारांगणांनी झोपड्या उभारून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने शनिवारी चोख पोलीस

Encroachment deleted | अतिक्रमण हटविले

अतिक्रमण हटविले

अतिक्रमणामुळे नदीपात्र घटले : नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाई
गडचिरोली : आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या पुलालगत आंध्रप्रदेशातील वारांगणांनी झोपड्या उभारून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने शनिवारी चोख पोलीस बंदोबस्तात शासकीय जमिनीवरील या वस्तीतील अतिक्रमण हटविले. दरम्यान पोलिसांना पाहून तरूण मुली व आंबटशौकिनांनी पलायन केले.
यापूर्वी विसापूर मार्गालगत पक्क्या घरांमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मात्र प्रशासनाने पाऊले उचलून या वारांगणाच्या वस्तीतील अतिक्रमण काढून त्यांचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर वारांगणा व आंबटशौकीनांची पंचाईत झाली. दीड महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील वारांगणा कठाणी नदी काठालगत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या वस्तीलगत शेती आहे, लगतच्या आरमोरी मार्गावरून गडचिरोली येथे परिसरातील मुली व मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. याशिवाय या मार्गाने दिवसभर वाहनधारकांची वर्दळ असते.
मार्गालगत असलेल्या या वारांगणाच्या वस्तीचा शेतकरी, महिला मजूर, पुरूष, शाळा महाविद्यालय मुले, मुली यांना त्रास होत होता. या संदर्भात नगराध्यक्ष निर्मला मडके व न.प. मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांच्याकडे लेखी तक्रार प्राप्त झाली होती. यापुढेही जाऊन नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून या वस्तीतील अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती.
न.प. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याबाबत १५ दिवसांपूर्वी येथील वारांगणांना मौखीक सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी अतिक्रमण काढले नाही. अखेर निर्वाणीचा इशारा म्हणून अतिक्रमण काढण्याच्या दोन दिवसांपूर्वी तत्काळ अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. यावेळीही वारांगणांनी अतिक्रमण काढले नाही. अखेर न.प. प्रशासनाने कठोर पाऊले उचलत चोख पोलीस बंदोबस्तात जेसीबी व ट्रॅक्टरसह धडक देऊन या वस्तीतील अतिक्रमण काढले. यावेळी न.प. मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे, अभियंता सुरज पुनवटकर, गिरिष मैंद, नंदाजी कुकडे, आर. पी. गिरोले तसेच गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक विकास दिंडोरे, पोलीस उपनिरिक्षक अंकूश माने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Encroachment deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.