शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव माेहिमेने पुन्हा पकडला जाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष करून इंदिरा गांधी चाैकात तर अगदी रस्त्यापर्यंत दुकाने पाेहाेचली हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगर परिषद प्रशासनाने आठ दिवसांनंतर पुन्हा मंगळवारपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली आहे. ज्या दुकानदारांचे लाेखंडी ठेले अतिक्रमित जागेवर हाेते, ते क्रेनच्या साहाय्याने उचलले जात हाेते. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष करून इंदिरा गांधी चाैकात तर अगदी रस्त्यापर्यंत दुकाने पाेहाेचली हाेती. नगर परिषदेचे प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. दुकानदारांनी स्वत: ठेले न हटविल्यास नगर परिषद प्रशासन ठेले  उचलेल अशी तंबी दिल्यानंतर  दुकानदारांनी स्वत:च ठेले उचलण्यास सुरुवात केली. 

 इंदिरा गांधी चाैकाने  घेतला माेकळा श्वास इंदिरा गांधी चाैक हा शहरातील मुख्य चाैक आहे. मात्र, चारही बाजूने असलेल्या अतिक्रमित ठेल्यांमुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी राहत हाेती. पानठेले, दुकानांवर येणारे ग्राहक अगदी रस्त्यावरच वाहने उभी ठेवत हाेती. अतिक्रमण हटल्यामुळे चारही बाजूने ऐसपैस जागा दिसून येत आहे. 

नागरिकांना झाली रूचेश जयवंशी यांची आठवणसात ते आठ वर्षांपूर्वी आयएएस असलेले रूचेश जयवंशी हे मुख्याधिकारी बनले हाेते. त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. त्याही वेळी अतिक्रमण काढण्याला बराच विराेध झाला हाेता. मात्र, कुणाचीही न मानता त्यांनी अतिक्रमण काढले हाेते. सध्याच्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे नागरिकांना त्यांची आठवण झाली.

पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही याची व्यवस्था करावीअतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांनंतर त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या घटना आजपर्यंत घडत आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण हाेणार नाही, अशी कायमस्वरूपी व्यवस्था हाेण्याची गरज आहे. 

हातगाडी ठेवू द्यावीरस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीवर अस्थायी हातगाडी ठेवून व्यवसाय करू द्यावा. रात्री साेबत हातगाडी घरी नेली जाईल, अशी अपेक्षा दुकानदारांनी केली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण