महिलांचे सक्षमीकरण आवश्यक

By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:37+5:302016-03-20T02:13:37+5:30

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच करणे अशक्य आहे.

Empowerment of women is necessary | महिलांचे सक्षमीकरण आवश्यक

महिलांचे सक्षमीकरण आवश्यक

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : अहेरी येथे जिल्हास्तरीय महिला मेळावा
अहेरी : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच करणे अशक्य आहे. समाज, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या घटकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
अहेरी येथील हॉकी ग्राऊंडवर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जाधव, जि.प. सदस्य कविता गेडाम, पार्वता कन्नाके, नंदा दुर्गे, ग्यानकुमारी कौशी, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, अहेरी नगर पंचायतीच्या सभापती अर्चना विरगोनवार, उपसभापती ममता पटवर्धन, स्मिता येमुलवार, नारायण सिडाम, नगरसेवक रेखा सडमाके, हर्षा ठाकरे, कमल पडगेलवार, एटापल्ली पंचायत समितीचे सभापती दीपक फुलसंगे, अहेरीचे प्रकल्प अधिकारी आर. डी. मेश्राम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन जाधव, संचालन प्रा. शाम हेडाऊ तर आभार उषा घोडमारे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Empowerment of women is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.