शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाेलिसांच्या पुढाकाराने १ हजार ५८० युवकांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 5:00 AM

पोलिसांच्या नागरी कृती शाखेच्यावतीने २४ जुलै राेजी आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळालेले युवक हैदराबाद येथे, तर नर्सिंग असिस्टंट म्हणून नियुक्ती मिळालेल्या युवती वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सोमय मुंढे (अभियान) प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देदाेन वर्षातील कामगिरी, सुरक्षारक्षक, नर्सिंग असिस्टंट पदावर नियुक्ती

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने  मागील दाेन वर्षात जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील आतापर्यंत १५८० युवक-युवतींना रोजगार मिळाला. त्यात ३७५ सुरक्षारक्षक, १०६० नर्सिंग असिस्टंट, १०० हॉस्पिटॅलिटी, तर ४५ ऑटोमोबाईल क्षेत्रात राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. २४ जुलै राेजी आयाेजित राेजगार मेळाव्यात ३५ युवकांना सुरक्षारक्षकपदी, तर ७० युवतींना नर्सिंग असिस्टंटपदी  नियुक्ती मिळाली. पोलिसांच्या नागरी कृती शाखेच्यावतीने २४ जुलै राेजी आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळालेले युवक हैदराबाद येथे, तर नर्सिंग असिस्टंट म्हणून नियुक्ती मिळालेल्या युवती वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सोमय मुंढे (अभियान) प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. या संधीमुळे कुटुंबीयांचे जीवनमान उंचावेल. आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रपरिवाराला याबाबतची माहिती देऊन पोलिसांच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एम्स प्रोटेक्शन प्रा. लि., हैदराबादचे मलेश यादव, लाईफ सर्कल हेल्थ सर्व्हिसेसचे श्रीनिवास सुधाला, ओल्ड एज होम हैदराबादच्या अंकिता बोरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एपीआय महादेव शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नक्षल्यांसाेबत लढतानाच गडचिराेली पाेलीस दल असे समाजाेपयाेगी उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांची नागरिकांकडून प्रशंसा हाेत आहे.

१२९ युवकांनी थाटला स्वयंराेजगारपाेलिसांच्यावतीने युवकांना स्वयंराेजगाराचेही प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण घेतलेल्या १२९ युवक-युवतींनी व्यवसाय स्थापन करून ते स्वावलंबी बनले आहेत. पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींनी सुध्दा स्वत:चा राेजगार सुरू केला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसjobनोकरी