शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थितीच्या स्वाक्षऱ्या करून रात्री कर्मचारी गायब

By admin | Updated: September 2, 2016 01:20 IST

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दैनंदिन हजेरीपत्रावर त्यांच्या वेळेप्रमाणे सह्या मारून गायब होत असल्याचा प्रकार

अहेरी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दैनंदिन हजेरीपत्रावर त्यांच्या वेळेप्रमाणे सह्या मारून गायब होत असल्याचा प्रकार ३१ आॅगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला. महागाव येथील रहिवासी लचमा वाघाडे याला ३१ आॅगस्टच्या रात्री ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यासाठी नेले असता, वाहनचालक व चौकीदार वगळता एकही कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हता. वाघाडे यांना तत्काळ अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविल्याने त्यांचे प्राण वाचले. महागाव येथील रहिवासी लचमा वाघाडे यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. २७ आॅगस्ट रोजी लचमा वाघाडे हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले असता, त्यांच्या शरीरात केवळ दोनच एचबी रक्त असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना एक सलाईन व दोन गोळ्या देऊन घरी पाठविण्यात आले. तीन दिवसानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना महागाव येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रात्रीच्या सुमारास एकही आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हता. या रूग्णालयात तीन डॉक्टर तीन परिचारिका व इतर कर्मचारी असे एकूण १९ कर्मचारी आहेत. निवासस्थानी बघितले असता, सर्व निवासस्थानांना कुलूप लावून असल्याचे दिसून आले. केवळ रूग्णवाहिकेचे चालक एस. यू. गेडाम व शिपाई टी. के. म्हशाखेत्री उपस्थित होते. लचमा वाघाडे यांची प्रकृती आणखी बिघडल्याने याच रूग्णालयातील एका परिचारिकेला लचमा वाघाडेच्या नातेवाईकांनी फोन केला असता, सदर परिचारिकेने रूग्णांना रूग्णालयात आणायची ही वेळ आहे काय? मी आता आलापल्ली येथे असल्याचे सांगून फोन बंद केला. वाहनचालक एस. यू. गेडाम यांनी वाघाडे यांना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. त्यामुळे वाघाडे यांचे प्राण वाचले. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात गावे येतात. प्रसुतीच्या केसेस या ठिकाणी दाखल होत असल्याने किमान एक डॉक्टर व एक आरोग्य कर्मचारी रात्रीच्या सुमारास हजर असणे आवश्यक आहे. मात्र एकही कर्मचारी रात्री या रूग्णालयात उपस्थित राहत नसल्याचे अनेकवेळा सिध्द झाले आहे. (प्रतिनिधी)तक्रारीनंतरही आरोग्य विभागाकडून दखल नाहीमहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वच कर्मचारी रात्रीच्या सुमारास आरोग्य केंद्रात राहत नाही. बहुतांश कर्मचारी अहेरी व आलापल्ली येथे मुक्कामी राहतात. सह्या मात्र जातेवेळी करून जातात. याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेकडे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा केली आहे. ही बाब जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याही लक्षात आणून देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषदेने संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची हिंमत वाढत चालली आहे. या अगोदर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे दोन गरोदर मातांच्या आरोग्य केंद्राच्या फाटकाजवळच प्रसुती झाल्या आहेत. आरोग्य कर्मचारी अनुपस्थितीत राहत नसल्याने रूग्णांना अहेरी रूग्णालयात हलवावे लागते. सर्व कर्मचाऱ्यांना निवासस्थानी व मुख्यालयी उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय अलोणे, सरपंच विनायक वेलादी, राजेश दुर्गे, चंद्रजी रामटेके, उमेश रामटेके, हुरूप अलोणे, शंकर झाडे यांनी दिला आहे.