शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दस्तावेजाच्या पसाऱ्यात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या !

By admin | Updated: March 4, 2015 02:03 IST

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्यात आली.

जि.प. इमारतीतील विदारक वास्तवजागेवरून कर्मचाऱ्यांमध्ये होते शाब्दिक चकमकजुन्या इमारतीच्या विस्ताराची गरजगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्यात आली. त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या कमी होती व शासनाच्या योजनाही मर्यादित प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची इमारत पुरेशी होती. मात्र मागील आठ वर्षांपासून शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी व नियमित कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र जिल्हा परिषदेची इमारत आहे तेवढीच आहे. नवीन कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबरोबरच जुने व नवीन दस्तावेज ठेवावे लागत आहे. दिवसेंदिवस दस्तावेजाचे गठ्ठे वाढत चालले आहेत. आलमाऱ्या पूर्णपणे भरल्याने गठ्ठे बाहेरच ठेवावे लागत आहेत. या गठ्ठ्यांच्या गर्दीत कर्मचाऱ्यांना स्वत:चे टेबल व खुर्च्या ठेवण्यासाठीही जागा मिळणे कठीण झाले आहे. एका खोलीत दोन ते तीन विभागाचे कर्मचाऱ्यांना राहावे लागत आहे. अधिकारी वर्गाचे कक्षही वाटून घेतले जात आहे. बऱ्याचवेळा खुर्ची व टेबल लावण्यावरून, दस्तावेजाचे गठ्ठे काढण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकही उडत आहे. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले असून इमारतीचे विस्तारीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.एकाच संगणकावर पाचपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा भारजिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तुलनेत संगणकाची संख्या अत्यंत कमी आहे. प्रत्येक विभागात फक्त दोन ते तीन संगणक आढळून येतात. त्यामुळे एकाच संगणकावर पाच पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. मंत्रालयातून तत्काळ माहिती मागितल्यानंतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते.दिगांबर जवादे ल्ल गडचिरोलीवाढत्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेची इमारत अपुरी पडत आहे. दस्तावेज ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने संबंधित विभागातच दस्तावेजाचे गठ्ठे ठेवले जात आहेत. त्यामुळे बसण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. ही अडचण लक्षात घेता इमारतीचे विस्तारीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.ंजिल्हा परिषदेतील दस्तावेजाची अडचण अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्याही लक्षात आली आहे. कृषी विभागाचे गोदाम दस्तावेज ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे. सदर गोदाम त्यासाठी लवकरच तयार केले जाणार आहे. गोदाम उपलब्ध झाल्यानंतर दस्तावेजाची समस्या मिटेल.- शामराव कुंभार, अभियंता, बांधकाम विभाग, जि.प. गडचिरोली