सामान्य रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:47+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात विविध भौतिक व आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

Emphasis on building infrastructure in general hospitals | सामान्य रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

सामान्य रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

Next
ठळक मुद्देकोरोना संशयितासाठी वार्ड : दोन वॉर्डातील रुग्ण हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वच्छतेबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच सदर रूग्णालयात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. विद्युत फिटींग व फर्निचर तयार करण्याचे काम कारागिरांकडून सुरू आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात विविध भौतिक व आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
वार्ड क्रमांक ५ हे कोरोना क्वारंटाईन व संशयीत रूग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या वार्डात दोन भाग आहेत. एका भागात संशयीत रूग्णांची व्यवस्था करण्यात आली असून दुसऱ्या भागात विद्युत फिटींग व फर्निचर बसविण्याचे काम केले जात आहे. सद्य:स्थितीत या रूग्णालयात एकच क्वॉरंटाईन रूग्ण आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या कामामुळे शस्त्रक्रिया रूग्णांसाठी असलेल्या वार्ड क्रमांक १ व वार्ड क्रमांक २ च्या रूग्णांना नेत्र रूग्णालयाच्या इमारतीत हलविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या रूग्णालयात नियमित स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पायºयावरील ग्रिलची स्वच्छता कामगारांकडून केली जात आहे. दुसºया मजल्यावर फर्निचर फिटींगचे काम सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर रूग्णालयाचे प्रशासन सतर्क झाले असून खबरदारी घेतली जात आहे. बायोमेट्रिकवर हजेरी न नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Web Title: Emphasis on building infrastructure in general hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.