आरमोरी तालुक्यात हत्तीचां धुमाकूळ; कापणी व मळणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:44 IST2025-05-10T16:43:12+5:302025-05-10T16:44:08+5:30

Gadchiroli : खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून नुकसान ग्रस्त शेतांची पाहणी

Elephant stampede in Armori taluka; Extensive damage to crops that were being harvested and threshed | आरमोरी तालुक्यात हत्तीचां धुमाकूळ; कापणी व मळणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Elephant stampede in Armori taluka; Extensive damage to crops that were being harvested and threshed

प्रमोद मेश्राम 
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील सतत हत्तीच्या धुमाकूळामुळे मक्का पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तीनीं संपूर्ण मक्का नष्ट केला आहे. याची माहिती मिळताच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी कुरंझा, देलोडा (बुज) व देशपुर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जावून नुकसान ग्रस्त सोलर पॅनल पंप  व पिकांची पाहणी केली. सदर नुकसानीचे रीतसर वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना वन खात्यातील कर्मचाऱ्यांना दिल्या. 


परिसरात मक्का पिकाची लागवड शेतकरी करीत असतात. ऐन कापणी व मळणीला आलेल्या मक्कापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी  लागवड केलेली होती. परंतु हत्तीच्या धुमाकुळामुळे नुकसान होत असेल तर शेतात पिक कसे काढायचे व बँकेचे कर्जे कसे फेडायचे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी काँग्रेस कडून अनेक आंदोलणे कारण्यांत आली परंतु शासन व प्रशासन याविषयी उदासीन दिसून येते. 


यावेळी  जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, जिल्हा उपाध्यक्ष कागज कमिटी गडचिरोली दिलीप घोडाम, ऋषीजी मानकर, मारुती तुमराम, किशोर जांभुळकर,  किशोर उपरीकर, दिलीप आत्राम, यादव जांभुळकर, पुरुषोत्तम मगरे, पराग जांभुळकर, किशोर मसाखेत्री, डस्टर जांभुळकर, सौ.शितलताई मानकर, सौ.मंगला नागापूरे, सौ.समताताई जांभूळकर, सौ.पूर्णाताई जांभुळकर, सौ. प्रीतीताई जांभुळकर, सागर जांभुळकर परिसरातील ग्रसित शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Elephant stampede in Armori taluka; Extensive damage to crops that were being harvested and threshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.