पथदिवे, पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा पूर्ववत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:42+5:302021-07-23T04:22:42+5:30
जिल्हाप्रमुख चंदेल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बुधवारी २४ तासांत वीजजाेडणी करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार वीज कार्यालयात उपकार्यकारी ...

पथदिवे, पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा पूर्ववत करणार
जिल्हाप्रमुख चंदेल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बुधवारी २४ तासांत वीजजाेडणी करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार वीज कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सचिन साळवे यांना घेराव घालून निवेदन दिले. साळवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वीजजोडणी करण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच कृषिपंपधारकांनी चालू बिल भरल्यास वीज तोडणार नाही, असे सांगितले.
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, कुरूडच्या सरपंच प्रशाला गेडाम, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, आमगावच्या सरपंच बोदेले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, पोटगावचे सरपंच विजय दडमल, शंकरपूरचे सरपंच वालदे, उपसरपंच पंकज वंजारी, किन्हाळाच्या सरपंच सुनीता श्रीरामे, माजी जि. प. सदस्य दिगांबर मेश्राम, तालुका प्रमुख विजय सहारे, शिवराजपूरचे उपसरपंच रमेश वाढई, माजी तालुकाप्रमुख नंदू चावला, बालाजी ठाकरे, विठ्ठल ढोरे, माजी शहरप्रमुख विकास प्रधान, महेंद्र मेश्राम व शिवसैनिक उपस्थित होते.
220721\1642-img-20210722-wa0007.jpg
स्ट्रीट लाईट सुरू