जिल्ह्यातील विद्युत अभियंते संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST2021-08-26T04:39:50+5:302021-08-26T04:39:50+5:30

गडचिराेली : सबआर्डिनेट इंजिनिअर असाेसिएशन गडचिराेलीच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरण अर्थात विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांनी संप पुकारला असून, अतिरिक्त कार्यभार ...

Electrical engineers on strike in the district | जिल्ह्यातील विद्युत अभियंते संपावर

जिल्ह्यातील विद्युत अभियंते संपावर

गडचिराेली : सबआर्डिनेट इंजिनिअर असाेसिएशन गडचिराेलीच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरण अर्थात विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांनी संप पुकारला असून, अतिरिक्त कार्यभार साेडला आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनात खळबळ उडाली असून, वीज सेवेवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

बुधवारी गडचिराेली येथील वीज अभियंत्यांनी मंडळ कार्यालयासमाेर द्वार सभा घेऊन कंपन्यांच्या धाेरणाचा निषेध नाेंदविला. या सभेत असाेसिएशनचे जिल्हा सहसचिव पुरुषाेत्तम वंजारी यांनी अभियंत्यांना संबाेधित केले. आता दुसऱ्या टप्प्यात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार साेडल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती प्रशासन अभियंत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने सबआर्डिनेट इंजिनिअर असाेसिएशनच्या वतीने ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीत तीनही कंपन्यांच्या प्रशासन दरबारी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, हे आश्वासन फाेल ठरले. महापारेषण प्रशासनाने ऑर्डर नं.३ नुसार स्टाॅफसेट अप धाेरण एकतर्फी लागू करण्याचा डाव आणला. दरम्यान, अभियंत्यांची ५०० पेक्षा अधिक पदे रिक्त ठेवण्याचा घाट रचल्याचा आराेप संघटनेने केला आहे.

महावितरण प्रशासनाने सर्वसाधारण बदली धाेरणामध्ये ‘अनिवार्य रिक्तपदे’ ही संकल्पना आणल्याने सर्वसामान्यांच्या बदल्यांवर अंकुश आलेले आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संघटनेच्या वतीने वारंवार चर्चा करूनही ताेडगा न निघाल्याने असाेसिएशनच्या वतीने १९ ऑगस्टला प्रशासनाला संपाची नाेटीस देण्यात आले.

बाॅक्स...

६ सप्टेंबरला लाक्षणिक संप

येत्या ६ सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याची हाक सबआर्डिनेट इंजिनिअर असाेसिएशनने दिली असून, प्रशासनाने मागण्या निकाली न काढल्यास बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Web Title: Electrical engineers on strike in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.