येंगलखेडा ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. त्यामध्ये एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे चार सदस्य निवडून आले. नियाेजित कार्यक्रमानुसार १५ फेब्रुवारी राेजी सरपंच व उपसरपंचांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. बहुमत असलेल्या पाच सदस्यांच्या गटातील एक सदस्य विराेधी गटाकडे गेला. त्यामुळे बहुमतातील गट अल्पमतात येऊन अल्पमतातील गटाकडे बहुमत झाले. यावरून साेमवारी दाेन गटांमध्ये ग्रामपंचायतीसमाेर प्रचंड भांडण झाले. भांडणामुळे एका गटाचे सदस्य सभागृहात पाेहाेचू शकले नाही. परिणामी काेरम पूर्ण झाला नाही. त्यामुळे सभा दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुढे ढकलण्यात आली. मंगळवारीसुद्धा भांडण हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन पाेलिसांना पाचारण करण्यात आले हाेते. पाेलिसांच्या बंदाेबस्तात मंगळवारी सभा पार पडली. गुप्त मतदानाने सरपंच पदावर सदानंद हलामी तर उपसरपंच पदावर रेमाजी किरणापुरे यांची ५ विरूद्ध ४ या बहुमताने निवड करण्यात आली.
पाेलीस बंदाेबस्तात येंगलखेडाच्या सरपंचाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST