कर्मचारी कल्याण समितीची निवडणूक अविरोध
By Admin | Updated: March 20, 2017 01:33 IST2017-03-20T01:33:15+5:302017-03-20T01:33:15+5:30
महसूल कर्मचारी कल्याण निधी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महसूल कर्मचारी

कर्मचारी कल्याण समितीची निवडणूक अविरोध
सहा संवर्गातून उमेदवार : निवडीचा जल्लोष केला साजरा
गडचिरोली : महसूल कर्मचारी कल्याण निधी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महसूल कर्मचारी कल्याण निधी समितीची निवडणूक अविरोध पार पडली.
एकूण सहा संवर्गाच्या पदाच्या निवडणुकीकरिता सहा अर्ज प्राप्त झाले. या निवडणुकीत उपजिल्हाधिकारी संवर्गात दुर्वेश सोनवने, तहसीलदर संवर्गात महेंद्र सोनोने, नायब तहसीलदार संवर्गात प्रभाकर कुबळे, उप लेखापाल/अव्वल कारकून संवर्गात चंदू प्रधान, अव्वल कारकून (सचिव) संवर्गात सत्यनारायण अनमदवार, लिपीक टंकलेखन संवर्गात संदीप राऊत यांची अविरोध निवड करण्यात आली. याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहायक निवडणूक अधिकारी एस. पी. पडघन, के. बी. इंगळे, अजय लाकुडवाहे, आर. वाय. कऱ्हाडे, बी. डब्ल्यू कापकर यांनी जबाबदारी पार पाडली. (प्रतिनिधी)