देसाईगंज, शिवनीतील वयाेवृद्ध महिलांचा काेराेनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:32+5:302021-03-31T04:37:32+5:30

मंगळवारी जिल्ह्यात ३७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील ...

Elderly women in Desaiganj, Shivni die due to carina | देसाईगंज, शिवनीतील वयाेवृद्ध महिलांचा काेराेनामुळे मृत्यू

देसाईगंज, शिवनीतील वयाेवृद्ध महिलांचा काेराेनामुळे मृत्यू

मंगळवारी जिल्ह्यात ३७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या १० हजार ५५५ एवढी झाली आहे. त्यापैकी १० हजार ३३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ४११ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३.८९ टक्के, तर मृत्युदर १.०५ टक्के झाला. नवीन ३७ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २८, अहेरी १, भामरागड तालुक्यातील १, कुरखेडा एक जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील अयोध्यानगर ६, कलेक्टर कॉलनी १, वसा ४, पोस्ट ऑफिसजवळ २, नवेगाव कॉम्पलेक्स १, आशीर्वादनगर ३, आयटीआय चौक १, कारगीर चौक १, रिलायन्स पेट्रोल पंप १, पोस्ट कॉलनी १, कनेरी १, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली १, अहेरी तालुक्यातील स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये ६, लाेकबिरादरी प्रकल्प हेमलकसा १, तर इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

Web Title: Elderly women in Desaiganj, Shivni die due to carina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.