नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकासाठी आठ नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:41 IST2019-01-07T22:40:53+5:302019-01-07T22:41:12+5:30

आरमोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सहाव्या दिवशी ७ जानेवारीला नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एका उमेदवाराने तर नगरसेवकपदासाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी सोमवारी नामांकन दाखल केले.

Eight nominations for municipal corporation | नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकासाठी आठ नामांकन

नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकासाठी आठ नामांकन

ठळक मुद्देशिवसेनेचे सर्वाधिक : १२ उमेदवारांनी सादर केले अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सहाव्या दिवशी ७ जानेवारीला नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एका उमेदवाराने तर नगरसेवकपदासाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी सोमवारी नामांकन दाखल केले.
२ जानेवारीपासून पालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र पहिल्या, दुसऱ्या व तिसºया दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही. चौथ्या दिवशी ५ जानेवारीला शिवसेनेच्या चार उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी नामांकन दाखल केले. सहाव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या एका उमेदवाराने नामांकन दाखल केले. नगरसेवकपदासाठी आठ उमेदवारांनी शिवसेनेच्या वतीने नामांकन दाखल केले. आतापर्यंत दाखल एकूण १२ उमेदवार शिवसेनेचेच आहेत हे विशेष.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना शिवसेना सोडली तर अन्य राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी नामांकन सादर करण्याकडे पाठ फिरविली आहे. ७ जानेवारीला सोमवारी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी मडावी आकाश रामकृष्ण यांनी नामांकन दाखल केले.

Web Title: Eight nominations for municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.