शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी, 'दक्षिण'मध्ये सर्वाधिक श्रीमंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:00 IST

नामांकनातून माहिती समोर : गडचिरोलीत एकही नाही कोट्यधीश

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन मतदारसंघात २९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांनी नामांकनासोबत जाहीर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार तब्बल आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी आहेत. यात दक्षिण गडचिरोलीतीलअहेरी मतदारसंघात सर्वाधिक पाच उमेदवारांचा समावेश असून आरमोरीतील तिघांच्या संपत्तीचे आकडेही कोटीच्या घरात आहेत.

शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल व मागास म्हणविणाऱ्या गडचिरोलीतील प्रमुख उमेदवारांच्या श्रीमंतीची यानिमित्ताने सर्वत्र चर्चा आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरीत आत्राम राजपरिवाराचा गेली अनेक वर्षांपासून दबदबा आहे. अहेरी इस्टेटचाही परिसरात वेगळा रुतबा आहे. तीनवेळा राज्यमंत्री राहिलेले धर्मरावबाबा सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सहा कोटी रुपयांची घट झाल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात दिसत आहे. त्यांचे पुतणे व अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मालमत्तेत ५० लाखांहून अधिक वाढ झाली आहे. 

आरमोरीचे माजी आमदार व काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष मैदानात उतरलेले माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या संपत्तीतही पाच वर्षांत २७ लाखांची वाढ आहे. आरमोरीचे आमदार व महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ३८ लाख ५० हजारांची भर पडली आहे. 

गडचिरोलीत 'वंचित'च्या येरमेंची संपत्ती नरोटे, पोरेटींपेक्षा अधिकगडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे हे ३९ लाख २३ हजार रुपयांच्या संपत्तीचे धनी आहेत, महाविकास आघाडीचे उमेवादार मनोहर पोरेटी यांची संपत्ती ३८ लाख ३० हजार आहे. या दोहोंपेक्षा काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष म्हणून मैदानात आलेल्या डॉ. सोनल कोवेंची संपत्ती अधिक आहे. त्यांच्याकडे ४६ लाख २९ हजार रुपयांची संपत्ती आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भरत येरमे हे संपत्तीच्या बाबतीत सर्वांत वजनदार आहेत. त्यांच्याकडे ५० लाखांची मालमत्ता आहे 

कोणाची किती संपत्ती ? धर्मरावबाबा आत्राम (महायुती) ३ कोटी ७१ लाख ५ हजार भाग्यश्री आत्राम (मविआ) ६ कोटी ५८ लाख ५ हजार अम्ब्रीशराव आत्राम (अपक्ष) ९ कोटी २७ लाख ७२ हजार दीपक आत्राम (अपक्ष) १ कोटी १७ लाख ८० हजारहनमंतु मडावी (अपक्ष) १ कोटी २ लाख ७५ हजार आनंदराव गेडाम (अपक्ष) १ कोटी ६४ लाख ७८ हजार डॉ. शिलू चिमूरकर (अपक्ष) ४ कोटी ५ लाख रामदास मसराम (मविआ) २ कोटी ५० लाख ६० हजार

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aheri-acअहेरीGadchiroliगडचिरोली