शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी शाळांवर धडकले

By admin | Updated: October 20, 2014 23:11 IST

जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक

समायोजन : जिल्ह्यात ४३४ अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीदिलीप दहेलकर - गडचिरोलीजि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेच्या अधिनस्त शाळेत सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खुद्द शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी शाळांवर धडक देऊन दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन केले.सन २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक शाळांमधील वर्गांची पटसंख्या कमी आढळून आली. पटसंख्या कमी आढळून आलेल्या शाळेतील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. मात्र कोणते कर्मचारी अतिरिक्त ठरवायचे, हे संस्थांनीच निश्चित करावेत, असेही शिक्षण विभागाचे निर्देश आहेत.पटपडताळणी मोहिमेदरम्यान पटसंख्या कमी आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील १७३ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. तसेच ३६१ शिक्षकेत्तर कर्मचारीही अतिरिक्त झाले असल्याची माहिती आहे. अतिरिक्त झालेल्या १७३ शिक्षकांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या खासगी अनुदानित माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. एकूण ४३४ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसात १४ शिक्षकांचे संस्थेच्या स्तरावर समायोजन केले आहे. आता अतिरिक्त ठरलेल्या २५ शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली असून या शिक्षकांचे २८ आॅक्टोबरपर्यंत शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन पूर्ण करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील १०० ते १२५ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे शिक्षण विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा आधार घेण्यात येणार आहे. २०१५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबत १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये, या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात यावे, यासाठी मंत्रालयात राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची भेट घेऊन शिक्षक आमदारांनी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी समायोजन न झालेला एकही शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नसून त्यांना नियमित वेतन दिले जाईल व इतर शाळांमध्ये अशा कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने १४ आॅक्टोबर रोजी परिपत्रक काढून जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे निर्देशही या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी संपर्क साधला असता, दोन अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन केल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिला.