देसाईगंज रुग्णालयातील ईसीजी मशीन दोन वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:12+5:302021-03-17T04:38:12+5:30
अचानक छातीत दुखू लागल्यास, अथवा कमरेत दुखू लागल्यास तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात रेफर ...

देसाईगंज रुग्णालयातील ईसीजी मशीन दोन वर्षांपासून बंद
अचानक छातीत दुखू लागल्यास, अथवा कमरेत दुखू लागल्यास तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात रेफर करतात. मात्र, सदर मशीन बंद अवस्थेत असल्याने आराेग्य तपासणी हाेत नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत असे रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात, तर गरिबांना मात्र या रुग्णालयातच तडफडत राहावे लागते. खासगी डाॅक्टर ईसीजी काढण्याचे तीनशे रुपये, तर सोनोग्राफीसाठी सहाशे रुपये घेतात. अल्पदरात रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्याऐवजी नाहकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यासंदर्भात देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मिसार यांना विचारणा केली असता ईसीजी मशीनसंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच नवीन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.