लॉकडाऊनच्या काळात 'शेवया'च्या व्यवसायाने मिळाला कुटुंबाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:57+5:302021-05-12T04:37:57+5:30
महेश श्यामराव नागुलवार हा आष्टी येथील एका कॉन्व्हेंटमध्ये काम करीत होता. मागील वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागले ...

लॉकडाऊनच्या काळात 'शेवया'च्या व्यवसायाने मिळाला कुटुंबाला आधार
महेश श्यामराव नागुलवार हा आष्टी येथील एका कॉन्व्हेंटमध्ये काम करीत होता. मागील वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागले आणि शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येत नव्हता. अशा परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न महेशला पडला आणि त्याने हिंमत न हारता शेवया व्यवसायाला सुरुवात केली. उन्हाळा आला की पापड, कुरुड्या, वड्या, शेवया, सांडगे आदी पदार्थ बनविण्याची स्त्रियांची लगबग असते, परंतु यांत्रिक युगात हे सर्व पदार्थ यंत्रांच्या सहाय्याने करीत असल्याने स्त्रियांना थोडा दिलासा मिळाला. ओल्या गव्हाचे पीठ आणि रवा यांच्यापासून शेवया बनविण्यासाठी २० रुपये पायली प्रमाणे मेहनत घेतो आणि एका दिवसाला ५०० ते ६०० रुपये आर्थिक मिळकत होते. या कामात त्याला त्याच्या पत्नीची सुद्धा तेवढीच मदत मिळत असते.त्या बरोबरच तांदळाच्या, गव्हाच्या कुरुड्या, मुगाच्या वड्या आदी पदार्थ त्याची पत्नी बनवून विकते. सध्या या वाळवणाला जोरदार मागणी आहे.