During the elections, six checkpoints will be closed | निवडणुकीदरम्यान सहा ठिकाणी राहणार तपासणी नाके

निवडणुकीदरम्यान सहा ठिकाणी राहणार तपासणी नाके

ठळक मुद्देचार भरारी पथके : गडचिरोली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या सीमांवर सहा तपासणी नाके उभारले जातील. येणाºया प्रत्येक वाहनाची या ठिकाणी तपासणी केली जाईल. तसेच तीन व्हिडीओ काढणाऱ्या चमू तर चार भरारी पथके राहतील अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ८५ हजार ७०७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४५ हजार ७४६ पुरूष तर १ लाख ३९ हजार ९६१ स्त्री मतदार आहेत. १८ ते २१ वयोगटातील ८ हजार २२३ मतदार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज हटविण्यास सुरूवात झाली. बहूतांश ठिकाणचे होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यांना आंचारसंहिता व व्हिव्हिपॅटचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रमुख प्रिंटिंग प्रेस चालकांचीही सभा घेण्यात आली. उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित करताना कोणती काळजी घ्यावी, या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री १० वाजतानंतर ध्वनीक्षेपक लावता येणार नाही. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्रे आहेत. मतदारांना मतदानाच्यावेळी ओळखपत्र म्हणून वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट आदी ११ प्रकारचे दाखले चालतील. दूर्गा उत्सवाच्या कालावधीतही आचारसंहितेचा भंग होणार नाही. या साठी निवडणूक विभागाची नजर राहणार आहे. अशी माहिती गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे.

२४ पर्यंत मतदार नोंदणी
१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या युवकाला मतदार नोंदणी २४ सप्टेंबर पर्यंत करता येणार आहे. संबधीत तहसीलदार किंवा बीएलओ यांच्याकडे नोदंणी करता येईल अशी माहिती डॉ. जाखड यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

Web Title: During the elections, six checkpoints will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.