तंमुसमुळे गावातच हाेते तंट्यांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:55+5:302021-03-15T04:32:55+5:30
पूर्वी अनेक किरकोळ कारणामुळे नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत होते तर अनेकांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मानसिक त्रासाचा ...

तंमुसमुळे गावातच हाेते तंट्यांचा निपटारा
पूर्वी अनेक किरकोळ कारणामुळे नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत होते तर अनेकांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मानसिक त्रासाचा सामना करावा लागत होता पण तंटामुक्ती समितीमुळे अनेकांचे पोलीस स्टेशनला न जाता समितीकडूनच काम होते. मुख्य म्हणून तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि पोलीस पाटील हे समोर येत असतात आणि गावातच बहुतांश तंटे गावातच सोडवले जातात. यामुळे पोलीस पाटील मुख्यतः घटक असून हा गावातील तंटे पोलीस स्टेशन न गाठता गावी निर्णय देऊन दोन्ही पार्टीला समाधान करण्याचे काम समिती करीत असते. कोंढाळा येथील तंटामुक्ती समितीला पुरस्कार प्राप्त झाला असून ती रक्कम गावाच्या विकासावर खर्च करण्यात आली आहे. चौकात बसण्याची व्यवस्था म्हणून सिमेंटच्या खुर्च्या तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक बावनकर तालुक्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेक पोलीस पाटलांचे मनोबल वाढत आहे. गावातच तंटे कसे मिटणार, यावर समितीचा भर असतो म्हणून तंटामुक्ती समितीला पसंती दिली जात आहे.