ट्रॅक्स उलटून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:05 IST2018-01-07T01:03:59+5:302018-01-07T01:05:16+5:30

धानोरा तालुका मुख्यालयावरून मुरूमगावला प्रवासी सोडून धानोराकडे परत येत असलेल्या महिंद्रा ट्रॅक्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्स उलटून ट्रॅक्स चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्यालयावरून १८ किमी अंतरावर हत्तीगोटा गावानजीक घडली.

Driver's death by overtaking tracks | ट्रॅक्स उलटून चालकाचा मृत्यू

ट्रॅक्स उलटून चालकाचा मृत्यू

ठळक मुद्देहत्तीगोटा नजीकची घटना : शवविच्छेदनासाठी रूग्णालयात प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा तालुका मुख्यालयावरून मुरूमगावला प्रवासी सोडून धानोराकडे परत येत असलेल्या महिंद्रा ट्रॅक्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्स उलटून ट्रॅक्स चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्यालयावरून १८ किमी अंतरावर हत्तीगोटा गावानजीक घडली.
जितेंद्र मुरारी सयाम (२४) रा. सुरसुंडी असे मृतक चालकाचे नाव आहे. एमएच ३३ ए २९८ क्रमांकाच्या महिंद्रा वाहनावर जितेंद्र सयाम चालक म्हणून कार्यरत होता. धानोरा तालुका मुख्यालयावरून सयाम याने मुरूमगावला प्रवासी सोडले. तिथून धानोराकडून परत येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रॅक्स उलटून चालक या वाहनात दबला. त्यामुळे तो जागीच ठार झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच सकाळी येरकड पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात चालक सयाम याचा मृतदेह पाठविला. मात्र या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांनी या शवविच्छेदन गृहासमोर प्रचंड गर्दी केली.
सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक वराड करीत आहेत.

Web Title: Driver's death by overtaking tracks

टॅग्स :Accidentअपघात