योजना घराघरांत पोहोचवा
By Admin | Updated: October 25, 2016 00:59 IST2016-10-25T00:59:30+5:302016-10-25T00:59:30+5:30
केंद्र व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. दोन्ही सरकारच्या वतीने सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून ...

योजना घराघरांत पोहोचवा
कुरखेडात कार्यकारिणीची बैठक : खासदारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
कुरखेडा : केंद्र व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. दोन्ही सरकारच्या वतीने सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ सामान्य जनतेला व्हावा, या हेतूने योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी घराघरांत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी सोमवारी केले. कुरखेडा तालुका भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. नेते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे कुरखेडा तालुका प्रभारी नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, रवींद्र बावनथडे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, खेमनाथ डोंंगरवार, राजन खुने, व्यंकटी नागिलवार, आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे उपस्थित होते.
शासनाविषयी चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना धडा शिकवावा, असे आवाहन आ. क्रिष्णा गजबे यांनी बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष राम लांजेवार तर आभार डॉ. मनोहर आत्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
यांचा झाला प्रवेश
भाजप कार्यकारिणीत शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख खुशाल दखणे, शिवसेनेचे विजय भैसारे, राकाँचे कार्यकर्ते तथा मालेवाडाचे माजी सरपंच बाळकृष्ण शेडमाके, सोनसरीचे माजी सरपंच चंदू प्रधान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रवेशितांचा सत्कार करण्यात आला.