शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिनेटमध्ये गुणवाढीच्या संशयाचे पडसाद; 'गोंडवाना' विद्यापीठाने फेटाळला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:27 IST

Gadchiroli : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाला फेब्रुवारी महिन्यात अचानक ठोकण्यात आलेल्या 'सील' मुळे निर्माण झालेल्या गुणवाढीच्या संशयाचे पडसाद १० मार्च रोजी झालेल्या सिनेट बैठकीत उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाला फेब्रुवारी महिन्यात अचानक ठोकण्यात आलेल्या 'सील' मुळे निर्माण झालेल्या गुणवाढीच्या संशयाचे पडसाद १० मार्च रोजी झालेल्या सिनेट बैठकीत उमटले. सिनेट सदस्यांनी या प्रकरणाचा जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, 'असा कोणताही प्रकार घडलेलाच नाही' असा दावा करत प्रशासनाने सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सिनेट बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य उपस्थित होते.

सिनेट सदस्यांनी विचारला जाब

फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मूल्यांकन विभागाला सील लावण्यात आले होते. यावरून माध्यमांमध्ये गुणवाढीच्या प्रकाराबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचाच संदर्भ देत सिनेट सदस्य अजय लोंढे, यश बोबडे आणि संजय रामगिरवार यांनी प्रशासनाला जाब विचारला नेमके काय घडले? सील का लावले? आणि कारवाई काय झाली? असे सवाल करत सदस्यांनी जवळपास ३० ते ४० मिनिटे सभागृह गाजवले.

प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा

सदस्यांच्या प्रश्नांचा भडिमार सुरू असतानाच, विद्यापीठ प्रशासनाने आपली बाजू मांडली. विद्यापीठात गुणवाढीचा कोणताही प्रकार मुळीच घडलेला नाही, हे सर्व आरोप निराधार आहेत, असे उत्तर जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले. प्रशासनाने हा सर्व प्रकार फेटाळून लावल्याने सध्यातरी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी शैक्षणिक वर्तुळात मात्र यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

"विद्यापीठात गुणवाढीचा असा कुठलाही प्रकार घडला नाही. सिनेटच्या बैठकीत सदस्यांना याबाबत योग्य ती उत्तरे देण्यात आली."- डॉ. प्रवीण पोटदुखे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

English
हिंदी सारांश
Web Title : Senate Echoes Grade Inflation Suspicion; Gondwana University Denies Claim

Web Summary : Gondwana University faced scrutiny over alleged grade inflation after a department sealing. Senate members questioned the administration, which strongly denied any wrongdoing. Despite the denial, speculation continues in academic circles.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली