खर्रा खाऊ नका व देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:53+5:30

खर्रा हा विषारी पदार्थ आहे. तो खाल्ल्याने कॅन्सर होतो. तोंडाचा वास येतो. खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे गावात खर्रा विकू नका. आमच्या पालकांना विष देऊन हिरावून घेऊ नका तसेच लहान मुलांना अजिबात खर्रा देऊ नका, अशी कळकळीची विनंती तालुक्यातील सावली येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी खर्राविक्री करणाऱ्यांना केली. शुक्रवारी गावात रॅली काढून विक्रेत्यांना विनंती पत्र देत जनजागृतीही केली.

Don't eat snacks and don't give up | खर्रा खाऊ नका व देऊ नका

खर्रा खाऊ नका व देऊ नका

ठळक मुद्देविद्यार्थी व महिलांचे आवाहन : सावली गावात जनजागृती रॅली, विक्रेत्यांना विनंतीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : खर्रा हा विषारी पदार्थ आहे. तो खाल्ल्याने कॅन्सर होतो. तोंडाचा वास येतो. खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे गावात खर्रा विकू नका. आमच्या पालकांना विष देऊन हिरावून घेऊ नका तसेच लहान मुलांना अजिबात खर्रा देऊ नका, अशी कळकळीची विनंती तालुक्यातील सावली येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी खर्राविक्री करणाऱ्यांना केली. शुक्रवारी गावात रॅली काढून विक्रेत्यांना विनंती पत्र देत जनजागृतीही केली.
सावली गावात ५ किराणा दुकानदार खर्राविक्री करतात. यात काही महिला विक्रेत्यांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांचे पालक नेहमीच या दुकानांमध्ये खर्रा विकत घेण्यासाठी जात असतात. परिणामी गावात किराणा दुकानांमध्ये खर्रा विकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू झाला आहे. विशेष म्हणजे खर्रा बनवून देणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असल्याने गावातील इतर महिलाही खर्रा घेण्यासाठी येण्याचे प्रमाण वाढत आहे. मुक्तिपथ अंतर्गत मुक्तिदिन आणि तंबाखूमुक्त शाळेच्या माध्यमातून तंबाखू व खर्रा सेवनाने होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना कळायला लागले आहे. त्यामुळे गावातील खर्राविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमू आणि शिक्षकांच्या सहकार्यान येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून खर्रा विक्री करणाºयांना हा विषारी पदार्थ विकणे बंद करण्याची लेखी विनंती विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केली. सोबतच खर्रा विष आहे, खाऊ नका, देऊ नका, खाऊ देऊ नका अशा घोषणाही दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक यात सहभागी झाले होते.
निरोगी आयुष्यासाठी आहार पोषक असतानाच तंबाखू, खर्रा अशा हानिकारक पदार्थांपासून दूर राहणेही आवश्यक आहे. दरम्यान गावात पोषण आहार सप्ताह असल्याने अंगणवाडी सेविकाही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. ‘सही पोषण देश रोशन’ अशा घोषणा देत खर्रा खाणे सोडण्याचे आवाहन त्यांनी गावकºयांना केले.

Web Title: Don't eat snacks and don't give up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.