शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

‘डोंगा’ हीच इंद्रावतीच्या बेटावरील त्या आदिवासींसाठी बुलेट ट्रेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे.

श्रीधर डुग्गीरालापाटीलाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : ‘पुराच्या पाण्याने गावाचा संपर्क तुटला...’ असा हेडींगच्या बातम्या गेल्या कित्येक वर्षापासून दर पावसाळ्यात वाचायला मिळतात, पण बाराही महिने त्या गावाला पाण्याचा वेढा कायम असतो. साधं मोबाईलचं नेटवर्क नसेल किंवा बॅटरी 'लो' झाली की आपल्या जीवाची घालमेल सुरू होते. पण हे गाव तर कायमच संपर्काबाहेर असतं. अशा या गावातील लोक कसे राहात असतील आणि कसे जगत असतील? असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. त्या गावाचे नाव आहे ‘कुर्ता’.महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या मधोमध बेटावर अनेक वर्षांपासून हे गाव वसले आहे. अहेरी तालुक्यात येत असलेल्या दामरंचा ग्रामपंचायतअंतर्गत या गावाचा समावेश होतो. मात्र मेट्रो, बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गावातील माणसं अजूनही आदिम जीवन जगत असल्याचं वास्तव आहे. गाव बेटावर वसले असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल, ना मेट्रो, ना बुलेट ट्रेन आहे. आहे तो केवळ पारंपरिक डोंगा (छोटी नाव). हा डोंगाच आदिवासींसाठी बुलेट ट्रेन झाला आहे. दामरंचावरून तीन किमी अंतर डोंगर, जंगलातून वाट काढत पार करावे लागते. इतके दिव्य पार केल्यानंतरही पायपीट संपत नाही. इंद्रावतीपर्यंत पोहोचले की, गावकऱ्यांनी स्वतः लाकडापासून तयार केलेल्या बोटीचा वापर करून जलप्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती बाराही महिने असते. इंद्रावती नदीचे पात्र मोठे असल्याने बाराही महिने पाणी असते. चारही बाजुने चमचमणारे पाणी, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गाव म्हणजे पर्यंटकांसाठी स्वर्गच. पण या धरतीवरच्या स्वर्गात जाण्यासाठी रस्ताच, गावातील घरांमध्ये वीज पुरवठाही नाही. गावात प्रवेश केल्यावर पडक्या झोपड्या, दोन-चार भांडी, दोन-चार पिशव्या, चुलीसाठी मांडलेले तीन दगड आणि काही कपडे दिसतात.

कुणी छत्तीसगडी, कुणी महाराष्ट्राचे रहिवासी-    गावात असलेल्या अवघ्या पाच ते सहा कुटुंबांशी संपर्क साधला असता काही नागरिकांकडे छत्तीसगड आणि काहींकडे महाराष्ट्राचे आधारकार्ड असल्याचे दिसून आले. काही आदिवासींना घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी घर बांधकाम करायला साहित्य नेण्याची मोठी अडचण असल्याने आहे त्याच परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे.

सरकार पुढाकार घेणार का?मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी बांधव वास्तव्याने असून बाराही महिने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने काही कुटुंबांनी हे गाव सोडल्याचे सांगितले जाते. उरलेले पाच ते सहा कुटुंब बाहेर का येत नाही असे विचारले असता 'आम्हाला जागा कोण देणार, शेती सोडून आल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार, शासनाने पुढाकार घेऊन मदत केल्यास आम्ही बाहेर येऊ' असे आदिवासी बांधवांनी सांगितलं. जगाच्या सानिध्यात आणि जवळ आणण्यासाठी या गावाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनriverनदी