शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्सला लागणार डाॅक्टरांचे प्रमाणपत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:40 IST

गडचिराेली : वयाची चाळीस वर्षे पूर्ण केलेल्या वाहनधारकांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले ...

गडचिराेली : वयाची चाळीस वर्षे पूर्ण केलेल्या वाहनधारकांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाइन सादर करायचे होते. मात्र, आता ऑनलाइन सादर कारावे लागणार आहे. त्यामुळे आता वयाच्या चाळिशीनंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या वाहनधारक अथवा नागरिकांना वाहन परवाना मिळणार आहे.

वाहनचालक हा वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तो व्यवस्थित वाहन चालवू शकतो. त्यामुळे वयाची चाळिशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टरांकडून ऑफलाइन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. याअंतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. परवान्यासाठी आता डाॅक्टरांकडे चकरा माराव्या लागणार आहेत.

बाॅक्स .....

लर्निंग लायसन्स

झाले ऑनलाइन

वाहन परवान्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालाकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याची ओरड वाहनधारकांकडून अनेकदा होत असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. या सेवेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यात शेकडाे ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्यात आले आहेत. या साेयीमुळे वाहनधारकांच्या वेळेची बचत हाेऊन सुलभता आली आहे.

बाॅक्स ......

किती वयापर्यंत मिळते लायसन्स

-वाहन चालवायचा परवाना घेण्यासाठी चालकाचे वय किमान १६ असणे गरजेचे आहे.

-कोणत्याही वयापर्यंत चालकाला लायसन्स काढता येते किंवा नूतनीकरण करता येते; परंतु वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. अन्यथा वाहन लायसन्स काढताही येत नाही किंवा नूतनीकरण करता येत नाही.

-केंद्र शासनाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कामात बराच बदल केला आहे. याची

अंमलबजावणी सुरू आहे.

बाॅक्स .....

एका डाॅक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार

-पूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरही हे प्रमाणपत्र द्यायचे; परंतु यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केवळ एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचेच प्रमापत्र ग्राह्य धरले जाते.

-एका डॉक्टरला दिवसातून केवळ २० जणांना परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मुभा दिली आहे.

-चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींना परवाना किंवा नूतनीकरणासाठी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. त्यासाठी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.

काेट ....

यापूर्वी वयाच्या चाळिशीनंतर परवाना काढायचा असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक हाेते; परंतु ते आता ऑनलाइन मागविण्यात येणार आहे. याकरिता लाॅगीन देण्यात येणार असून, प्रक्रिया झाल्यावर ते अपलाेड करावे लागणार आहे.

- रवींद्र भुयार

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिराेली