संचारबंदी शिथील झाल्यानंतरही मुलांना घराबाहेर साेडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST2021-05-16T05:00:00+5:302021-05-16T05:00:28+5:30

काेराेनाच्या पहिल्या लाटेत केवळ वृद्ध नागरिकांनाच सर्वाधिक त्रास झाला. यात काही जणांना जीवही गमवावा लागला हाेता. तरुण मात्र लवकरच बरे हाेत हाेते. दुसऱ्या लाटेने मात्र तरुणांनाही चांगलेच जेरीस आणले. वृद्ध नागरिकांसह तरुणांचाही जीव गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण केली आहे. काेराना नावाचा राेगच नाही, हा तर केवळ दैनंदिन सर्दी, ताप, खाेकला आहे, असे म्हणणारे नागरिकही दुसऱ्या लाटेतील मृतकांचा आकडा बघून सावधगिरी बाळगायला लागले. 

Do not let children out of the house even after the curfew is relaxed | संचारबंदी शिथील झाल्यानंतरही मुलांना घराबाहेर साेडू नका

संचारबंदी शिथील झाल्यानंतरही मुलांना घराबाहेर साेडू नका

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेत मुलांनाच धाेका असल्याचे तज्ज्ञांचे संकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धाेका लहान मुलांना असल्याचे अंदाज साथ राेगावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संचारबंदीचे नियम शिथिल झालेे तरी मुलांना घरबाहेर पाठविणे धाेक्याचे ठरू शकते, असा इशारा बालराेग तज्ज्ञांनी दिला आहे.
काेराेनाच्या पहिल्या लाटेत केवळ वृद्ध नागरिकांनाच सर्वाधिक त्रास झाला. यात काही जणांना जीवही गमवावा लागला हाेता. तरुण मात्र लवकरच बरे हाेत हाेते. दुसऱ्या लाटेने मात्र तरुणांनाही चांगलेच जेरीस आणले. वृद्ध नागरिकांसह तरुणांचाही जीव गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण केली आहे. काेराना नावाचा राेगच नाही, हा तर केवळ दैनंदिन सर्दी, ताप, खाेकला आहे, असे म्हणणारे नागरिकही दुसऱ्या लाटेतील मृतकांचा आकडा बघून सावधगिरी बाळगायला लागले. 
दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्यांनतर शासनाकडून संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. अशा स्थितीत आजपर्यंत घरात असलेल्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याची पालकांची इच्छा हाेते. मात्र नाेव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात आणखी तिसरी लाट येण्याची शक्यता साथराेगाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत त्यांना घराबाहेर काढणे धाेक्याचे ठरू शकत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

बालकांवर उपचारासाठी प्रशासन सज्ज
तिसरी लाट मुलांवर आघात करणारी असल्याने आराेग्य प्रशासन सज्ज झाले आहे. बालरुग्णांची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र काेविड केअर सेंटर किंवा रुग्णालय उभारला जाऊ शकते, अशी माहिती आराेग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

लहान मुलांमध्ये आढळलेली लक्षणे
काेराेनाची सामान्य लक्षणे असलेली सर्दी, ताप, खाेकला हीच लक्षणे दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आढळून आली आहेत. 
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत काेराेनाचा संसर्ग हाेण्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. 
काही मुलांना अतिसार हाेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र अतिसारग्रस्तांचे प्रमाण कमी हाेते. 
काही मुलांमध्ये अशक्तपणा आढळून आला आहे. 

मुलांना काेराेनाची लागण प्रामुख्याने त्याच्या पालकांपासूनच हाेते. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मुलांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. तिसऱ्या लाटेत मुलांना धाेका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालकांनीच याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. 
डाॅ. राहुल ठवरे, बालराेगतज्ज्ञ 

काेराेना हा संसर्गजन्य राेग आहे. मुलाला काेराेना झाल्यास त्याच्यासाेबत पालकालाही रुग्णालयात राहावे लागेल. त्यामुळे मुलासाेबतच पालकांनाही काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता निर्माण हाेईल. बालकांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. त्यांंना रुग्णालयात १० दिवस ठेवणे कठीण हाेते. यासर्व अडचणी आहेत. 
डाॅ. जयंत पर्वते, बालराेग तज्ज्ञ
 

 

Web Title: Do not let children out of the house even after the curfew is relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.