शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शोषण प्रकरणातील आरोपीची डीएनए चाचणी निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी २३ ऑगस्टला भादंवि कलम ३७६ (२) (जे) सह पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये ...

या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी २३ ऑगस्टला भादंवि कलम ३७६ (२) (जे) सह पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिल्याची बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने आणि प्रसारमाध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. पीडिता गर्भवती असल्याने तिची डीएनए चाचणी करण्यास वेळ लागला. यादरम्यान अटकेत असलेल्या आराेपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

यादरम्यान पीडित मुलीची प्रसूती झाली व तिला बाळही झाले. यानंतर अटकेत असलेल्या आरोपी किरण अग्रवाल याची डी.एन.ए. तपासणी करण्यात आली. या तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने २ फेब्रुवारीला अग्रवाल यांना जामीन दिला.

त्या बाळाचा बाप कोण?

या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांनी न्यायालयात चार्जशिट दाखल केल्याचे सांगितले, पण ज्याला आरोपी म्हणून दाखविले त्याची डीएनए चाचणी जर निगेटिव्ह असेल तर, पीडित अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा तिच्या बाळाचा बाप कोण? असा प्रश्न शिल्लक आहे. नागरिकांमध्येही याबाबतची चर्चा सुरू आहे. वास्तविक या प्रश्नाचे खरे उत्तर पीडित मुलगीच देऊ शकते. पण कायद्याच्या पळवाटांचा फायदा संबंधिताला मिळाला तरी मग खरा आरोपी कोण? हे शोधून काढण्याचे आव्हान पोलीस स्वीकारतील का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. या प्रकरणात सामाजिक, राजकीय संघटना कोणती भूमिका घेतात याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.