शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. निवडणुकीनंतर ज्वर तापणार

By admin | Updated: September 18, 2014 23:35 IST

१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे नेते जिल्हा परिषद

गडचिरोली : २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीच्या समीकरण जुळवणीत व्यस्त असल्याने विधानसभा निवडणुकीचा ज्वर अद्याप तापलेला नाही. २० तारखेला प्रशासनाची विधानसभा निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २१ ला रविवारी जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान झाल्यानंतर गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तिनही विधानसभा मतदार संघात निवडणूक वातावरण तापण्यास सुरूवात होईल.जिल्ह्यात यंदा गैरआदिवासी मतदारांमध्ये विधानसभा निवडणुकीविषयी कमालीची उदासीनता आहे. मतदान करून आपले प्रश्न सुटत नसतील तर अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात काय फायदा, असा युक्तीवाद गैरआदिवासी मतदारांकडून केला जात आहे. पेसा कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात झाल्यामुळे गैरआदिवासी मतदार नोटा वापरण्याच्या भूमिकेवर आला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीत असलेल्या इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना मैदानात उतरविण्याची तयारीही काही सामाजिक संघटनांनी सुरू केली आहे. मोठ्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रस्थापीत जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे नवे मतदार नाराज आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्षात काम करणारे गैरआदिवासी नेतेही अद्याप प्रचारासाठी उतरलेले नाहीत. विद्यमान आमदार दिल्ली, मुंबईत तळ ठोकून आहेत. काही नेते जिल्हा परिषदेतील राजकीय समिकरण जुळविण्याच्या कामात आहे. ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २६ सदस्यांची गरज आहे. तेवढे संख्याबळ कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे मोठी मोट बांधवी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच मैदानात खरी गर्दी होईल. २७ तारखेला नामांकन पत्र भरण्याच्या अखेरीस चित्रही स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक साऱ्याच राजकीय पक्षांचा कस पाहणारी राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)