जिल्ह्याला मिळाले २२ डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ...

The district got 22 doctors | जिल्ह्याला मिळाले २२ डॉक्टर

जिल्ह्याला मिळाले २२ डॉक्टर

ठळक मुद्देतीन वर्ष सेवा बंधनकारक : जिल्हा निवड समितीने पाठविले नियुक्तीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली आहे. या नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था थोडीफार सक्षम होण्यास मदत होईल.
जिल्हा निवड समितीमार्फत १ एप्रिल रोजी गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमधील २८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता, सहायक समाज कल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर आदींच्या चमूने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्याबरोबर उमेदवारांना त्यांच्या मेलवर नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात रूजू होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नियुक्ती दिलेल्या डॉक्टरांना तीन वर्ष सेवा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. हे बंधन मान्य करणाºया उमेदवारांनाच नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासी बहुल व दुर्गम आहे. या भागात सेवा देण्यास डॉक्टर तयार होत नाही. नियुक्ती झालेले डॉक्टर सेवा सोडण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांची पदे नेहमीच रिक्त राहतात. मागील एक महिन्यापासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाची लागण गडचिरोली जिल्ह्यात झाल्यास पुरेसे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर नियुक्तीची प्रक्रिया अतिशय गतीने पार पाडण्यात आली आहे. नवीन डॉक्टर यांच्या नियुक्तीमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा थोडीफार सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओ कॉन्फरंिन्सगद्वारे मुलाखती
डॉक्टर पदासाठी भंडारा, नागपूर, नांदेड, बिड आदी जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज केले होते. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या उमेदवारांना केवळ मुलाखतीसाठी गडचिरोली येथे बोलविणे संयुक्तीक नव्हते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यात पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे डॉक्टरांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Web Title: The district got 22 doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.