शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

जिल्हा बँक उत्कृष्ट सेवेसाठी होणार सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांना सेवा देत आहेत. दुर्गम भागात असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडल्या आहेत. जिल्ह्यात बँकेचे एकूण ३० एटीएम आहेत. ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांची दखल : सलग सातव्यांदा कै.वैकुंठभाई मेहता पुरस्काराची मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्याचे मूल्यांकन करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील फक्त तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०१८-१९ या वर्षातील कामगिरीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा सहकारी बँक सलग सातव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली असून गेल्या तीन वर्षांपासून बँकेने प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांना सेवा देत आहेत. दुर्गम भागात असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडल्या आहेत. जिल्ह्यात बँकेचे एकूण ३० एटीएम आहेत. ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ५५ शाखांच्या माध्यमातून बँक तळागाळातील ४ लख ३० हजार ग्राहकांना बँकींग सेवा देत आहेत. बँकेकडे १ हजार ७५० कोटींच्या ठेवी आहेत. ९९० कोटींचे कर्ज वाटप केले आहेत. तीन हजार कोटींच्या व्यवसाय वाटचालीकडे बँक प्रगती करीत आहे.बँकेला पुरस्कारापर्यंत पोहोचविण्यात बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, सर्व संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्यासह ग्राहक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बँकींगचे व्यवहार याच बँकेमार्फत होत असून दुर्गम भागातही बँकेची सेवा मिळत आहे.उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मानपुरस्काराचे वितरण १० फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. २०१८-२९ चा प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेला जाहीर झाला. द्वितीय पुरस्कार सातारा तर तृतीय पुरस्कार सिंधूदुर्ग जिल्हा सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा बँकेने सन २०१२ ते २०१८-१९ या वर्षांमध्ये सलगत सातव्यांदा पुरस्कार पटकाविला आहे.

टॅग्स :bankबँक