ग्रामीण विकासात जिल्हा बँकेचा महत्त्वाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:35+5:302021-07-15T04:25:35+5:30

नाबार्डच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि.१४) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...

District Bank plays an important role in rural development | ग्रामीण विकासात जिल्हा बँकेचा महत्त्वाचा वाटा

ग्रामीण विकासात जिल्हा बँकेचा महत्त्वाचा वाटा

नाबार्डच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि.१४) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पाेरेड्डीवार, मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी, जिल्हा दुग्धविकास अधिकारी यादव, कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक डाॅ.संदीप कऱ्हाळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत वैद्य आणि जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रंचित पाेरेड्डीवार म्हणाले, नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध याेजना राबविल्या जातात. देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे आहे. त्यादृष्टीनेच जिल्हा बँकेकडून नियाेजन केले जात आहे. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे, असे पाेरेड्डीवार म्हणाले. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी म्हणाले, देशातील चांगल्या बँकांमध्ये नाबार्डचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पूल तसेच सिंचनाचे प्रकल्प यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला दिशा देण्याचे काम नाबार्डने केले आहे.

प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन व्यवस्थापक राजू साेरते यांनी तर आभार नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी यांनी मानले.

(बाॅक्स)

बचत गटांना कर्जाचे वितरण

या कार्यक्रमाप्रसंगी स्वयंराेजगार करू इच्छिणाऱ्या अडपल्ली, गडचिराेली येथील बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना केसीसी कार्डचे वितरण करण्यात आले, तसेच परिवर्तन प्रभातसंघ पाेर्ला या बचत गटाला बँकेमार्फत भेटवस्तू देण्यात आली.

(बॉक्स)

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षाराेपण

यावेळी बँकेच्या आवारात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा बँकेमार्फत ग्रामीण भागात आर्थिक व डिजिटल साक्षरतेविषयी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी बँकेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध याेजना, आर्थिक स्थिती याबाबतची माहिती सीईओ सतीश आयलवार यांच्याकडून जाणून घेतली.

Web Title: District Bank plays an important role in rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.