वेलगूर येथे बियाणे व साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:56+5:302021-07-17T04:27:56+5:30
मेळाव्यात कृषी विभाग, वन विभाग, महसूल विभाग, बस आगार आदींच्या वतीने विविध याेजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला कृषी अधिकारी ...

वेलगूर येथे बियाणे व साहित्य वाटप
मेळाव्यात कृषी विभाग, वन विभाग, महसूल विभाग, बस आगार आदींच्या वतीने विविध याेजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला कृषी अधिकारी दीपक कांबळे, सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, पं.स. उपसभापती गीता चालुरकर, मंडळ अधिकारी नारायण खरात, राजू सिडाम, कृषी सहायक वनिता मेश्राम, वेलगूरचे तलाठी इब्राहीम शेख, मुख्याध्यापक रमेश कुसनाके उपस्थित होते. याप्रसंगी गरजू शेतकऱ्यांना धान, मका, चवळी, टमाटे आदींची बियाणे वाटप करण्यात आली. तसेच फावडा, घमेला, टॉर्च व विविध प्रकारच्या झाडांचे रोप वाटप करण्यात आले. तसेच नवेगाव येथील युवकांना व्हॉलिबाॅल व नेट वाटप करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनेची माहिती देण्यात आली. यामध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना, कास्ट सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे याविषयी माहिती देण्यात आली. बाल संगोपन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, वृध्दांकरिता पेन्शन योजना, युवक/युवतींकरिता हाॅटेल मॅनेजमेंट कोर्स, नर्सिंग कोर्स, टेलरिंग, पोल्ट्री फार्म, फोटोग्राफी प्रशिक्षण आदींची माहिती देण्यात आली.
150721\4013img-20210715-wa0101.jpg
वेलगूर येथे पोलिस विभागाकडून भव्य कृषी मेळावा