शेतकऱ्यांना बियाणे व खते वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:34+5:302021-07-15T04:25:34+5:30
याप्रसंगी राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मानकर, वनरक्षक दादाजी कांदो, पोस्ट विभागाचे सुमित कपटे, सीआरपीएफचे पोलीस ...

शेतकऱ्यांना बियाणे व खते वाटप
याप्रसंगी राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मानकर, वनरक्षक दादाजी कांदो, पोस्ट विभागाचे सुमित कपटे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक अखिलेश पाठक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. उपस्थित विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून एक खिडकी योजनेतून राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी केले. मेळाव्यात नागरिकांना १५ प्लास्टिक घमेली, १५ बॅग युरिया, ३०६ आयुष्यमान भारत कार्ड, श्रावणबाळ योजना मंजूर प्रस्तावाचे आदेश वाटप १९ नागरिकांना करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पीएसआय केंद्रे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.