शेतकऱ्यांना बियाण्यांसह राेपट्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:54+5:302021-07-16T04:25:54+5:30
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ नरेश बुद्धेवार हाेते. उद्घाटन तालुका कृषी पर्यवेक्षक एन.जी. बडवाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख ...

शेतकऱ्यांना बियाण्यांसह राेपट्यांचे वाटप
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ नरेश बुद्धेवार हाेते. उद्घाटन तालुका कृषी पर्यवेक्षक एन.जी. बडवाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक माेहम्मद शेख, पेंढरीचे वनपाल नारायण सहारे, गट्टाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विनाेद ढबाले, मुख्याध्यापक सुधाकर बडगुजर, चिचाेडाचे ग्रामसचिव बी. आर. चतारे, गट्टाचे डी. एस.बारापात्रे, तलाठी अरविंद ढवळे, तुळशीराम हिचामी, दयाराम उसेंडी, रामसाय आतला आदी उपस्थित होते. सहारे यांनी वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना, सीताफळ, पेरू, शेवगा अशा २५ झाडांचे वाटप केले. तसेच पोलीस मदत केंद्राच्या वतीने नीलगिरीची २०० राेपटी वाटप करण्यात आली. तसेच १३० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० किलो प्रमाणे १३ क्विंटल धान बियाणे, ५० शेतकऱ्यांना प्रत्येकी १ किलोप्रमाणे ५० किलो तूर बियाणे, ३० शेतकऱ्यांना १ किलाेग्रॅम प्रमाणे एरंडी बियाणे यांचे वाटप करण्यात आले. गट्टा येथील खेळाडूंना १ व्हॉलिबॉल देण्यात आला. मेळाव्यास उपस्थित नागरिकांना प्रभारी अधिकारी पीएसआय सुरेश गीते व पीएसआय रवींद्र वाघ यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. सिव्हिक ॲक्शन टीमचे बंडू कोसनशीले, त्रिशीला गावंडे, सोनाली झुरी यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्र जमा करून घेतले. मेळाव्यास हद्दीतील २०० महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पीएसआय दत्ता कांभिरे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रमोद आपटे, सुधाकर नरोटे, पांडुरंग कुमोटी, रामदास मडावी, मोरोश्वर चापले, अपेक्षा शेंदरे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
प्रमाणपत्र वितरणासह ऑनलाईन प्रस्ताव
पोलीस दादालोरा खिडकी योजनेतून १२ शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा काढून देण्यात आले. ३ निराधार योजनेचे प्रस्ताव, १५ शेतकऱ्यांचे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अर्ज भरण्यात आले. बिरसा मुंडा कृषी योजने अंतर्गत २ शेतकऱ्यांचे नवीन विहिरींसाठी, १ ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे जमा करण्यात आली. १४ नागरिकांना जाॅब कार्ड वाटप करण्यात आले.