महसूल कर्मचाऱ्यांना गूळवेल वनस्पतींचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:06+5:302021-05-03T04:31:06+5:30
जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांची ऑनलाइन सभा पार पडली. याप्रसंगी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. जी. पित्तुलवार ...

महसूल कर्मचाऱ्यांना गूळवेल वनस्पतींचे वितरण
जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांची ऑनलाइन सभा पार पडली. याप्रसंगी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. जी. पित्तुलवार हाेते. प्रमुख अतिथी प्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, गडचिराेलीचे नायब तहसीलदार दामोदर भगत, धनराज वाकुडकर, माधुरी हनुमंते व कर्मचारी उपस्थित होते. गूळवेल वनस्पतीचे महत्त्व, तसेच काढा कसा तयार करावा याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. काेराेना आजारात प्राथमिक उपचार करण्याकरिता गूळवेल वनस्पतीबाबत सविस्तर माहिती सत्यनारायण अनमदवार यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन वनिश्याम येरमे, तर आभार कविता नायडू यांनी केले. कार्यक्रमाला सी. एम. चिलमवार, पराग खोबरागडे, तुळशीराम तुमरेटी, सोनाली कंकलवार, अर्चना दुधबावरे, महानंदा मडावी, किरण मेश्राम, स्नेहा चौधरी, संपत उईके, अनिल कुळमेथे, नारायण मेश्राम, सोनी लेनगुरे, दुर्गा मेश्राम, कविता गेडाम व महसूल कर्मचारी उपस्थित होते.