उसेगाव येथे मच्छरदानींचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:49+5:302021-03-26T04:36:49+5:30
देसाईगंज : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूडअंतर्गत उपकेंद्र शिवराजपूर गट ग्रामपंचायतमधील उसेगाव येथे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रणअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ...

उसेगाव येथे मच्छरदानींचे वितरण
देसाईगंज : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूडअंतर्गत उपकेंद्र शिवराजपूर गट ग्रामपंचायतमधील उसेगाव येथे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रणअंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती रोशनी पारधी यांच्या हस्ते मच्छरदानींचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवराजपूर गट ग्रामपंचायतच्या सरपंच सुषमा सयाम, देसाईगंज तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिषेक कुमरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. सडमेक, आरोग्य पर्यवेक्षक व्ही. जी. कुंभारे, आरोग्य सहायक जी. पी. कुर्वे, पी. एस. खुर्से, शिवराजपूर उपकेंद्रातील आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर, तांत्रिक पर्यवेक्षक भारती मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून डासांपासून उद्भवणारे आजार व त्यापासून करावयाच्या उपाययोजना याबाबत उपस्थित नागरिकांना यथायोग्य मार्गदर्शन करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या मच्छरदानीचा वापर व उपयोग याबाबतही उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना यथायोग्य माहिती दिली.