प्रमाणपत्रांसह साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:27+5:30

जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफ ११३ बटालीयनचे सहायक कमांडंट आर. सी. मीना यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पन्नेमाराचे सरपंच हरिष धुर्वे, रिडवाही जि. प. शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर शेडमाके, मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन मेश्राम, पन्नेमाराचे ग्रा. पं. सचिव सुनील बेलखेडे, चैनसिंग धुर्वे उपस्थित होते.

Distribution of materials with certificates | प्रमाणपत्रांसह साहित्य वाटप

प्रमाणपत्रांसह साहित्य वाटप

ठळक मुद्देरिडवाही येथे जनजागरण मेळावा : मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील पोलीस मदत केंद्राच्या वतीने रिडवाही येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक साहित्य व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याचा लाभ परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व नागरिकांनी घेतला.
जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफ ११३ बटालीयनचे सहायक कमांडंट आर. सी. मीना यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पन्नेमाराचे सरपंच हरिष धुर्वे, रिडवाही जि. प. शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर शेडमाके, मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन मेश्राम, पन्नेमाराचे ग्रा. पं. सचिव सुनील बेलखेडे, चैनसिंग धुर्वे उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. परिसरातील गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
पीएसआय सचिन पागोटे यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घ्यावा तसेच गटाच्या माध्यमातून रोजगार करावा. वनोपज गोळा करून रोजगार कशाप्रकारे मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सहायक कमांडंट आर. सी. मीना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुर्गम गावातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:सह आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मीना यांनी केले. सहभोजनाने जनजागरण मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमातून संस्कृतीची झलक
जनजागरण मेळाव्यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीची झलक दाखविली. कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून प्रोत्साहन बक्षीसे देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यसुद्धा वितरित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

Web Title: Distribution of materials with certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस